job vacancies esakal
एज्युकेशन जॉब्स

देशात बेरोजगारीत वाढ; एका महिन्यात गेल्या १५.५० लाख नोकऱ्या

सकाळ वृत्तसेवा

ऑगस्टमध्ये देशाचा बेरोजगारी दर ८.३२ टक्क्यांपर्यंत वाढल्याची चिंताजनक आकडेवारी सेंटर फाॅर माॅनिटरिंग इंडियन इकॉनाॅमीने (सीएमआयई) प्रसिद्ध केली आहे.

नवी दिल्ली - देशाचा जीडीपी, जीएसटी संकलन तसेच शेअर बाजारातही मोठी वाढ झाल्याने अर्थकारणाचे चक्र पुन्हा गतिमान झाल्याचे सकारात्मक चित्र निर्माण झाले होते; मात्र ऑगस्टमध्ये देशाचा बेरोजगारी दर ८.३२ टक्क्यांपर्यंत वाढल्याची चिंताजनक आकडेवारी सेंटर फाॅर माॅनिटरिंग इंडियन इकॉनाॅमीने (सीएमआयई) प्रसिद्ध केली आहे.

CMIE च्या आकडेवारीनूसार, आॅगस्टमध्ये तब्बल १५.५० लाख भारतीयांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या आहेत. त्यामुळे जीडीपी वाढत असला, तरी ऐन कोरोनाकाळात मध्यमवर्गीयांच्या खरेदीक्षमतेवर मोठा परिणाम झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.

सीएमआयईच्या आकडेवारीनुसार, जुलैमध्ये देशाचा बेरोजगारीचा दर ६.९५ टक्के होता; मात्र ऑगस्टमध्ये त्यात १.३७ टक्क्यांनी वाढ होऊन हा दर आता ८.३२ टक्क्यांपर्यंत गेला आहे. त्यातही शहरी बेराजगारीचे प्रमाण जुलैमध्ये ८.३ टक्के होते; आॅगस्टमध्ये हा दर तब्बल ९.७८ टक्क्यांवर गेला आहे.

ग्रामीण भागाला फटका

देशातील शहरांमध्ये जुलैमध्ये औपचारिक व अनौपचारिक क्षेत्रात जवळपास ३९.९३ कोटी लोकांना नोकऱ्या होत्या. आॅगस्टमध्ये ही संख्या ३९.७७ कोटीपर्यंत आली; तर ग्रामीण भागात १३ लाख नोकऱ्या कमी झाल्या. भाजपचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनीदेखील ट्विटरवर ही आकडेवारी शेअर करत चिंता व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT