Pune University sakal
एज्युकेशन जॉब्स

स्वायत्तता दर्जा मिळालेल्या महाविद्यालयांसाठी विद्यापीठाची मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

महाविद्यालयांनी पुढील शैक्षणिक वर्षापासून नवीन अभ्यासक्रम सुरू करण्याचा संपूर्ण आराखडा विद्यापीठास सादर करणे आवश्यक

सकाळ वृत्तसेवा

पुणे : स्वायत्त दर्जा मिळालेल्या महाविद्यालयांमधील नवीन अभ्यासक्रमांची रचना निश्चित करणे आता आवश्यक राहणार आहे. या महाविद्यालयांनी पुढील शैक्षणिक वर्षापासून नवीन अभ्यासक्रम सुरू करण्याचा संपूर्ण आराखडा आणि संलग्नीकरण अर्ज अगोदरच्या वर्षी ३० सप्टेंबरपूर्वी विद्यापीठास सादर करणे आवश्यक असेल, असे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. तसेच कोणत्याही स्वायत्त महाविद्यालयाला थेट पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू करता येणार नाही, त्यापूर्वी संबंधित विषयातील पदवी अभ्यासक्रमाच्या किमान दोन बॅचेस बाहेर पडलेल्या असणे आवश्यक असणार आहे.

पुणे विद्यापीठाशी संलग्नित काही महाविद्यालये, मान्यताप्राप्त परिसंस्थांना स्वायत्त दर्जा मिळत आहे. येत्या काही वर्षात आणखी काही महाविद्यालयांना हा दर्जा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्वायत्त दर्जा प्राप्त संलग्न महाविद्यालयांच्या समस्या आणि अडचणी लक्षात घेऊन मार्गदर्शक नियमावली तयार करण्यासाठी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी समिती स्थापन केली होती. या समितीने सादर केलेल्या अहवाल कुलगुरू यांनी स्वीकारला असून यातील शिफारशीनुसार विद्यापीठाने मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ आणि २०१९ एकरूप परिनियम क्रमांक तीन मधील तरतुदी विचारात घेऊन ही मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.

स्वायत्त दर्जा असलेल्या महाविद्यालयांना इतर स्वायत्तता दर्जा प्राप्त महाविद्यालयातील किंवा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पदवीच्या द्वितीय वर्षास प्रवेश देता येणार आहे. त्यासाठी संबंधित महाविद्यालयाच्या विद्या परिषदेने समकक्षता समिती स्थापन करून प्रवेश देण्याची कार्यवाही त्यांच्या स्तरावर करावी आणि अशा विद्यार्थ्यांची यादी विद्यापीठाच्या शैक्षणिक पात्रता विभागास सादर करावी, असे विद्यापीठाचे उपकुलसचिव मुंजाजी रासवे यांनी परिपत्रकात म्हटले आहे.

अशी असतील स्वायत्त महाविद्यालयांसाठी मार्गदर्शक तत्त्वे :

  • प्रत्येक पदवीपूर्व व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे मूल्य ठरविण्यासाठी शुल्क निश्चिती समिती असेल

  • विद्यमान तुकड्यांबाबत निर्णय घेऊन, प्रारंभी एक तुकडी सुरू करावी आणि अशा  

  • जास्तीत जास्त पाच तुकड्या सुरू करता येतील.

  • नवीन अभ्यासक्रम सुरू करताना विद्यार्थी प्रवेश क्षमता विद्यापीठाच्या प्रचलित नियमाप्रमाणे असणे बंधनकारक राहील.

  • नवीन अभ्यासक्रम प्रस्तावित करताना त्यासाठी आवश्यक भौतिक सुविधा, अध्यापक व प्रशासकीय कर्मचाऱ्यांची उपलब्धता असल्याबाबतचा पुरावा महाविद्यालयाच्या विद्या परिषदेच्या मान्यतेने प्रस्तावासोबत सादर करणे आवश्यक असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zilla Parishad Election : आदेश आला ! जिल्हा परिषद-पंचायत समितीचा धुरळा उडणार, आचारसंहिता दोन दिवसात शक्य, निवडणूक आयोगाकडून जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Latest Marathi News Live Update : मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक, मुंबईसाठी एक व्हा; राज ठाकरेंचं आवाहन

Bigg Boss Marathi 6 Live Update: कंटेंट क्रिएटर करण सोनवणेची 'बिग बॉस मराठी६' च्या घरात एंट्री

Pune Crime : शेअर बाजाराच्या नावाने अडीच कोटींचा डल्ला! ट्रेडज इन्व्हेस्टमेंटच्या संचालकांना हैदराबाद विमानतळावर बेड्या

अभिनयाचा पडदा ते राजकारणाचं मैदान गाजवणारी दीपाली सय्यदची बिग बॉसमध्ये एंट्री !

SCROLL FOR NEXT