exam
exam exam
एज्युकेशन जॉब्स

TET प्रश्नपत्रिका हातात पडली... आणि पेपर फुटला!

सकाळ डिजिटल टीम

लखनऊ : उत्तर प्रदेश शिक्षक पात्रता परीक्षा २०२१ (UP-TET) परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. एसटीएसच्या माहितीवरून उत्तर प्रदेश शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर व्हायरल झाल्याने परीक्षा नियामक प्राधिकरणाने दोन्ही शिफ्टच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. परीक्षा नियामक प्राधिकरणाचे सचिव संजय कुमार उपाध्याय यांनी सांगितले की, दोन्ही शिफ्टच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. पुन्हा परीक्षा एका महिन्याच्या आत उमेदवारांकडून कोणतेही शुल्क न घेता घेण्यात येईल. तसेच या संदर्भात एफआयआर नोंदवण्याच्या सूचना दिल्या आहेत. या प्रकरणाचा तपास यूपी एसटीएफकडे सोपवला जात आहे. जेणेकरून दोषींची ओळख पटवून कठोर कारवाई करता येईल.

TET 2021 ची परीक्षा रविवारी दोन शिफ्टमध्ये होणार होती. प्राथमिक स्तरावरील परीक्षा पहिल्या शिफ्टमध्ये १० ते १२.३० या वेळेत २,५५४ केंद्रांवर तर दुसऱ्या शिफ्टमध्ये २.३० ते ५ या वेळेत १,७५४ केंद्रांवर उच्च प्राथमिक स्तराची परीक्षा होणार होती. हे उल्लेखनीय आहे की टीईटी प्राथमिक स्तराच्या परीक्षेसाठी १३.५२ लाख उमेदवारांनी नोंदणी केली होती.

टीईटी उच्च प्राथमिक स्तराच्या परीक्षेसाठी ८.९३ लाख उमेदवारांनी नोंदणी केली होती. यापूर्वी २०१९ मध्ये झालेल्या UPTET मध्ये १६ लाख उमेदवार बसले होते. २०१८ मध्ये झालेल्या या परीक्षेत सुमारे ११ लाख उमेदवार बसले होते. टीईटी परीक्षेत पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने उमेदवार सहभागी होणार होते.

परीक्षा केंद्रांबाहेर फौजफाटा तैनात

टीईटी पेपर लीकप्रकरणी एसटीएफने शामली येथे तीन आरोपींना पकडले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रात्री पेपर व्हायरल झाला असून ग्रुप तयार करून परीक्षेची तयारी केली जात होती. हा पेपर गाझियाबाद, मेरठसह पश्चिम उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये व्हायरल होत आहे. मुरादाबादमध्ये यूपी टीईटी परीक्षा रद्द झाल्यानंतर गर्दी नियंत्रणासाठी परीक्षा केंद्रांबाहेर फौजफाटा तैनात करण्यात आला होता. कटघरचे सीओ आशुतोष तिवारी यांनी याला दुजोरा दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: अजित पवार अन् शरद पवार लग्न सोहळ्यानिमित्त एकत्र

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबादची पॉवरप्लेमध्ये खराब सुरूवात; राजस्थानने दिले दोन धक्के

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

PPF : दररोज 250 रुपये वाचवून तयार होईल 24 लाखांचा फंड, कसा ते वाचा ?

SCROLL FOR NEXT