UPSC
UPSC 
एज्युकेशन जॉब्स

UPSC CSE 2020: मुख्य परीक्षेचं अॅडमिट कार्ड करा डाऊनलोड; वाचा सविस्तर

सकाळ डिजिटल टीम

UPSC CSE Main Exam 2020: नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा मुख्य परीक्षेचं अॅडमिट कार्ड प्रसिद्ध करण्यात आली आहेत. यूपीएससीच्या अधिकृत वेबसाईटवरून ते डाऊनलोडही करता येऊ शकतं. मुख्य परीक्षा ८ ते १७ जानेवारी दरम्यान घेण्यात येणार आहे. दोन सत्रात ही परीक्षा घेण्यात येणार आहे. सकाळी ९ ते १२ आणि दुपारी २ ते ५ अशी दोन सत्रात परीक्षा होणार आहे.    

असं डाऊनलोड करा अॅडमिट कार्ड
- सर्वात आधी उमेदवारांनी यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जावे. 
- त्यानंतर होमपेजवर Whats New (व्हॉट्स न्यू) या सेक्शनमध्ये E-Admit Card- Civil Services (Mains) Exam [ई-अॅडमिट कार्ड - सिव्हिल सर्व्हिसेस (मेन)] एक्झाम या लिंकवर क्लिक करावे.
- नवीन विंडो उघडल्यानंतर Click Here वर पुन्हा एकदा क्लिक करा. 
- समोर दिसणाऱ्या सूचना काळजीपूर्वक वाचा आणि Yes वर क्लिक करा.
- तुम्हाला विचारली जाणारी माहिती भरा. त्यानंतर तुम्हाला अॅडमिट कार्ड दिसेल. 
- आता उमेदवार अॅडमिट कार्ड डाऊनलोड करू शकतात. सोईसाठी या अॅडमिट कार्डची प्रिंट घेऊन ठेवा.

नागरी सेवा परीक्षेची मुख्य परीक्षा ही लेखी स्वरुपातील परीक्षा आहे. जे उमेदवार ही परीक्षा पात्र करतील, त्यांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल. जो या नागरी सेवा परीक्षेचा अंतिम टप्पा आहे. जितक्या पदांची भरती करावयाची आहे, त्याच्या दुप्पट संख्येत उमेदवार मुलाखतीसाठी बोलावले जातील. 

शेवटी ज्या उमेदवारांची निवड होईल, त्यांना अखिल भारतीय प्रशासकीय सेवेच्या विविध पदांवर नियुक्त करण्यात येईल. यामध्ये आयएएस, आयपीएस, आयएफएस, आयआरएस आणि आरटीएस या सनदी सेवांचा समावेश आहे. उमेदवारांना अधिक माहिती जाणून घ्यायची असेल, तर त्यांनी यूपीएससीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी. खाली वेबसाईटची लिंक देण्यात आली आहे. 

UPSC च्या अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

- एज्युकेशन जॉब्ससंबंधी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

IPL 2024 RCB vs GT Live Score: यश दयालने गुजरातला दिला दुहेरी दणका! राशिद खानपाठोपाठ तेवतियाही बाद

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

Latest Marathi News Live Update: बाळासाहेबांना हिंदूहृदयसम्राट म्हणा- उद्धव ठाकरे

SCROLL FOR NEXT