UPSC Recruitment 2023 esakal
एज्युकेशन जॉब्स

UPSC Recruitment 2023 : लोक सेवा आयोग UPSC अंतर्गत एवढ्या पदांवर भरती, लगेच असा करा अर्ज

विद्यार्थी परीक्षेसाठी ३ ऑक्टोबर २०२३ पर्यंत अर्ज करू शकतात

साक्षी राऊत

UPSC Recruitment 2023 : संघ लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) आयएसएस आणि आयएफएस परीक्षा २०२३ साठी अनेक पदांच्या भरतीची जाहिरात जारी केली आहे. या परीक्षेअंतर्गत एकूण ५१ पदांची भरती करण्यात येणार आहे. यूपीएससी आयएसएस/आयएफएस परीक्षा २०२३ साठी अर्जप्रक्रियेस सुरुवात झाली आहे. विद्यार्थी परीक्षेसाठी ३ ऑक्टोबर २०२३ पर्यंत अर्ज करू शकतात.

परीक्षेसाठीची पात्रता, नियम आणि अर्ज प्रक्रियेबाबत सविस्त जाणून घेण्यासाठी आयोगाच्या ऑफिशियल वेबसाइटवर जाऊन संपूर्ण नोटिफिकेशन चेक करू शकता.

आयएफएस डीएएफ पदाच्या अर्जाची शेवटची तारीख

ऑनलाइन अर्जाला सुरुवात - २२-९-२०२३

ऑनलाइन अर्जाची शेवटची तारीख - ३-१०-२०२३

रिक्त पदे - ५१

इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिससाठीची पदे - १८

इंडियन स्टॅटिकल सर्व्हिससाठीची पदे - ३३

वयोमर्यादा

परीक्षार्थीने वय २१ ते ३० वर्ष असावे. तर आरक्षण वर्गाला सूट मिळेल.

परीक्षेसाठीची फी -सामान्य व ओबीसी वर्गासाठी २०० रुपये तर एससी, एसटी आणि दिव्यांगांसाठी परीक्षा निशुल्क असणार आहे.

यूपीएससी भरती २०२३ साठीची पात्रता

आयएफएस पदासाठी परीक्षार्थ्याजवळ अप्लाइड इकॉनॉमिक्स किंवा बिजनेस इकॉनॉमिक्स मध्ये मास्टर्स डिग्री असणे आवश्यक आहे. तर आयएफएस पदासाठी परीक्षार्थ्याजवळ स्टॅटिकल किंवा मॅथेमॅटिकल स्टॅटिस्टिक्स किंवा अप्लाइड स्टॅटिस्टिक्समध्ये ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री असणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी यूपीएससीची अधिकृत वेबसाइट https://www.upsc.gov.in/ वर नोटिफिकेशन बघू शकता. (UPSC Exam)

अर्जासाठीची प्रक्रिया

यूपीएससीअंतर्गत भरतीसाठी लेखी परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. ही लिखित परीक्षा १००० गुणांची असणार असून २०० पेक्षा अधिक गुण मिळालेले परीक्षार्थी मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरतील. मुख्य परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वडिलांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारच केले नाहीत; मृतदेह प्रिझर्व्ह करून ठेवला, मुंबईतील खळबळजनक घटना

Malvan Accident : दुचाकीच्या धडकेत भाजप नगरसेविकेसह चौघे जखमी, सरकारी दवाखान्यात एक्स रे मशीन बंद असल्याने संताप

LPG Cylinder Price: उद्यापासून गॅस सिलेंडर महागणार? महाराष्ट्रात आज कितीला मिळतो LPG, पाहा शहरनिहाय दर

Pradip Purnekar case: ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याच्या हत्येचा CCTV फुटेज समोर, ७ गोळ्या झाडल्याचा आवाज

Ayush Thite Organ Donation : सोलापूरच्या आयुषच्या हृदयाने रशियातील तीन वर्षांच्या चिमुकल्याला मिळणार नवजीवन; अवयवदानाने वाचणार चौघांचे प्राण

SCROLL FOR NEXT