UPSC result total of five candidates from Vidarbha got success Amit Undirwade Rahul Atram Prateek Korde Vaishali Dhande education sakal
एज्युकेशन जॉब्स

UPSC Result : युपीएससीमध्ये दोघा नागपूरकरांचा झेंडा; विदर्भातील एकूण पाच उमेदवारांना मिळाले यश

राज्य शासनाच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या नागपूरच्या भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्रामध्ये यातील काही विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेमध्ये नागपूर जिल्ह्यातील दोन उमेदवारांनी बाजी मारली असून यशाचा झेंडा फडकविला आहे. तर, विदर्भातील एकूण पाच उमेदवारांचा यामध्ये समावेश आहे. अमित उंदीरवाडे (५८१) (गोंदिया), राहुल आत्राम (६६३) (नागपूर), प्रतीक कोरडे (६३८) (नरखेड, जि. नागपूर), वैशाली धांडे (९०८) (अमरावती) अशी यशस्वी विद्यार्थ्यांची नावे आहेत.

केंद्रीय लोकसेवा आयोगाने २४ एप्रिल ते १८ मे २०२३ या कालावधीत ५८२ उमेदवारांची तिसऱ्या टप्प्यातील वैयक्तिक मुलाखत घेतली होती. मुलाखतीनंतर मंगळवारी निकाल जाहीर करण्यात आला. यात नागपूरच्या दोन विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. अनेक वर्षांनी आदिवासी समाजातील विद्यार्थी यूपीएससी उत्तीर्ण झाला आहे.

राज्य शासनाच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या नागपूरच्या भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्रामध्ये यातील काही विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. तर काहींनी केंद्राच्या दिल्ली येथे घेण्यात येणाऱ्या मुलाखतीच्या प्रशिक्षणाचा लाभ घेतला आहे.

केंद्राचे संचालक डॉ. प्रमोद लाखे यांनी केंद्रामध्ये प्रवेशित असणारे चार विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याची माहिती दिली. अमीत उंदीरवाडे, राहूल आत्राम, प्रतीक कोरडे, वैशाली धांडे यांच्यासह संगमनेर येथील राजश्री देशमुख उत्तीर्ण झाली आहे. अमरावतीची वैशाली सध्या नागपूर येथील जीएसटी ऑडिट(आयआरएस) कार्यालयात कार्यरत आहे.

प्रतीकला देशसेवेचा कौटुंबिक वारसा

बीएससी, एमए इंग्रजीमध्ये शिक्षण घेतलेल्या प्रतीक कोरडेने संरक्षण क्षेत्रामध्ये अधिकारी बनत देश सेवेचा ध्यास घेतला होता. २५ वर्षीय प्रतिकने त्यासाठी पूर्वी सीडीएस परीक्षा दिली. वडील वडील देखील संरक्षण दलातून निवृत्त झाल्याने हाच वारसा प्रतीकला पुढे चालवायची इच्छा होती.

मात्र, २०२० सालापासून त्याने युपीएससीची तयारी सुरू केली आणि दुसऱ्या प्रयत्नात ६२८ वा रँक मिळवत यश प्राप्त केले. विशेष म्हणजे प्रतिकला दोन बहिणी असून एक पोलिस उपनिरीक्षक आणि दुसरी वैद्यकीय क्षेत्रात सोशल वर्कर म्हणून सेवा देत आहे.

राहुल म्हणतो, आता आयएएससाठी प्रयत्न करणार

पदवीचे शिक्षण पूर्ण होताच दोन वर्षे जोमाने अभ्यास करून नागपूरच्या राहूल रमेश आत्राम याने दुसऱ्या प्रयत्नात ६६३ वा रँक घेत यश मिळवले. त्याला आयपीएस पद मिळण्याची शक्यता आहे. दिल्ली गाठायची ती केवळ मुलाखतीसाठी अशी खुणगाठ बांधली होती, असेही राहुल सांगतो. इतक्यावर समाधानी नसल्याने पुन्हा प्रयत्न करून आयएएस मिळवणार असा विश्वास राहुलने व्यक्त केला.

वडील रमेश आत्राम समाज कल्याणमध्ये अधिकारी असल्याने लहानपणापासून लोकांच्या समस्या जवळून पाहता आल्या. शिवाय मुळ गाव गडचिरोली जिल्ह्यातील असल्याने तेथील स्थानिक समस्यांना जवळून अनुभवता आले. त्यामुळे अशा शेवटच्या घटकातील नागरिकांसाठी काम करण्याची खुणगाठ बांधून यूपीएससीकडे वळल्याचे राहुल सांगतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडमध्ये कसोटी सामना पाहून भारावला, गिलबद्दलही बोलला; लक्ष्मणमुळे U19 टीम इंडियाला मिळाला स्पेशल अनुभव

पन्नाशीतही फिट दिसण्यासाठी ऐश्वर्या नारकर फॉलो करतात हे रुटीन ; "कढीपत्त्याचं पाणी आणि डाएटिंग..."

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Yeola Railway Station : येवला रेल्वे स्थानकाची पाहणी; ४ प्रमुख गाड्यांना थांबा देण्याची मागणी

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

SCROLL FOR NEXT