नॅशनल फर्टिलायझर्स Sakal
एज्युकेशन जॉब्स

नॅशनल फर्टिलायझर्समध्ये सरकारी नोकरीची संधी!

नॅशनल फर्टिलायझर्समध्ये सरकारी नोकरीची संधी! विविध पदांवर निघाली भरती

श्रीनिवास दुध्याल

सार्वजनिक क्षेत्रातील मिनी-रत्न कंपनी नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेडने (एनएफएल) विविध युनिट / कार्यालयांमध्ये 183 पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

सोलापूर : सार्वजनिक क्षेत्रातील मिनी-रत्न कंपनी नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेडने (National Fertilizers Limited - NFL) विविध युनिट / कार्यालयांमध्ये 183 पदांच्या भरतीसाठी (Recruitment) जाहिरात प्रसिद्ध केली आहे. कंपनीने बुधवारी (ता. 20) जारी केलेल्या भरती जाहिरातीनुसार कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक ग्रेड II (उत्पादन, इन्स्ट्रुमेंटेशन, इलेक्‍ट्रिकल), लोको अटेंडंट (ग्रेड II आणि ग्रेड- III), अटेंडंट ग्रेड -1 (मेकॅनिकल), फिटर आणि इलेक्‍ट्रिकल) आणि विपणन प्रतिनिधी पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.

उमेदवारांनी लक्षात घ्यावे, की ऑनलाइन अर्ज प्रक्रिया आज 21 ऑक्‍टोबर 2021 पासून सुरू झाली आहे आणि उमेदवार 10 नोव्हेंबर 2021 पर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करू शकतील. तथापि, अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी एनएफएल भरती 2021 अधिसूचना आणि ऑनलाइन अर्जाच्या पेजवर दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत.

असा करा अर्ज

नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेडमध्ये जाहिरात केलेल्या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार एनएफएलच्या अधिकृत nationalfertilizers.com या वेबसाइटवर उपलब्ध फॉर्मद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतील. वेबसाइटला भेट दिल्यानंतर उमेदवारांना करिअर सेक्‍शनमध्ये जावे लागेल. त्यानंतर रिक्रूटमेंट इन एनएफएल सेक्‍शनमध्ये जावे लागेल. येथे उमेदवारांना 'रिक्रूटमेंट ऑफ नॉन-एक्‍झिक्‍युटिव्ह्‌स (वर्कर्स) इन मार्केटिंग, ट्रान्स्पोर्टेशन एण्ड व्हेरियस टेक्‍निकल डिसिप्लिन्स - 2021' या लिंकवर क्‍लिक करावे लागेल. त्यानंतर उमेदवार अर्जाच्या पानावर पोचू शकतील.

पोस्टनिहाय रिक्त पदांची संख्या

  • कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक ग्रेड II (उत्पादन) - 87 पदे

  • कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक ग्रेड II (इन्स्ट्रुमेंटेशन) - 15 पदे

  • कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक ग्रेड II (इलेक्‍ट्रिकल) - 7 पदे

  • लोको अटेंडंट (ग्रेड II) - 4 पदे

  • लोको अटेंडंट (ग्रेड- III) - 19 पदे

  • परिचर ग्रेड- I (मेकॅनिकल-फिटर) - 17 पदे

  • अटेंडंट ग्रेड- I (इलेक्‍ट्रिकल) - 19 पदे

  • मार्केटिंग प्रतिनिधी - 15 पदे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कफ सिरपमध्ये ब्रेक ऑइलचं विषारी केमिकल, किडनी निकामी होऊन १४ मुलांचा मृत्यू; औषधावर घातली बंदी

Latest Marathi News Live Update: नोकरीमध्ये मराठी माणसाला स्थान नाही : संजय राऊत

Kolhapur Cricket : कोल्हापुरच्या पोरी महाराष्ट्राच्या क्रिकेट संघाच करणार नेतृत्व, टी-२० च्या कर्णधारपदी अनुजा पाटील

Salary Report 2025: भारतीयांच्या मासिक पगारात वाढ, केंद्र सरकारची आकडेवारी जाहीर, तुमचा ७ वर्षांत किती पगार वाढला?

Pune Murder News : पुण्यात पहाटे खुनाचा थरार! तरुणाच्या डोक्यात दगड घालून हत्या; कुठं घडली घटना?

SCROLL FOR NEXT