vijay Navle writes about how To become a collector education student sakal
एज्युकेशन जॉब्स

Collector : जिल्हाधिकारी होण्यासाठी....!

जिल्हाधिकारी (कलेक्टर) हे महसूल प्रशासनाचे जिल्ह्यातील सर्वोच्च अधिकारी असतात. जिल्हाधिकारी होण्यासाठीचे कमीत कमी वय आहे २१ वर्षे

सकाळ वृत्तसेवा

जिल्हाधिकारी (कलेक्टर) हे महसूल प्रशासनाचे जिल्ह्यातील सर्वोच्च अधिकारी असतात. जिल्हाधिकारी होण्यासाठीचे कमीत कमी वय आहे २१ वर्षे

- प्रा. विजय नवले

जिल्हाधिकारी (कलेक्टर) हे महसूल प्रशासनाचे जिल्ह्यातील सर्वोच्च अधिकारी असतात. जिल्हाधिकारी होण्यासाठीचे कमीत कमी वय आहे २१ वर्षे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षांमधून आयएएसची निवड होते. त्यातील काही अधिकाऱ्यांची जिल्हाधिकारी पदावर नेमणूक होते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातून उत्तीर्ण झालेले आणि काही वर्षे अनुभव असलेले अधिकारीदेखील पदोन्नतीने जिल्हाधिकारी बनू शकतात.

कोणत्या कामांची जबाबदारी?

जिल्ह्यातील जमिनीविषयीची कागदपत्रे, व्यवहार, महसूल नियोजनसोबतच कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची, आपत्ती व्यवस्थापनाची जबाबदारीही जिल्हाधिकाऱ्यांवर असते. जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणा त्यांच्या ताब्यात असते. पूर, दुष्काळ, वादळ, महामारी, दंगली या सर्वांना सामोरे जाण्याच्या टीमचे नेतृत्व जिल्हाधिकाऱ्यांवरच असते.जिल्ह्यातील विकासकामांचा आराखडा आणि नियोजनाची जबाबदारी पार पाडावी लागते. केंद्र आणि राज्य सरकारचे सर्व उपक्रम, धोरणे, योजना यांचे जिल्ह्यातील नियोजन जिल्हाधिकारी करत असतात. राज्य शासन आणि जिल्हा प्रशासन यांचा दुवा जिल्हाधिकारी असतात.

दैनंदिन कामांची विभागणी

सहकारी, विभागातील प्रमुख, तसेच सदस्य यांच्या बैठका घेणे. जिल्ह्यातील सर्व विभागांची माहिती घेणे. केंद्र आणि राज्याच्या योजना कार्यान्वित करणे. समोर आलेल्या केसेसमध्ये न्याय देणे, विविध विकासकामांची पाहणी करणे, वरिष्ठांपासून जिल्ह्यातील शेवटच्या घटकापर्यंत संपर्क ठेवणे यासह अन्य कामे दैनंदिन स्वरूपाची असतात.

काय मिळणार?

कामातील समाधान, थेट सामाजिक आशय असलेले काम, मान-मरातब, प्रतिष्ठा, पद, अधिकार, सामाजिक स्थान मिळते. अशा कामासाठीची संधी मिळणे दुर्मीळ मानले जाते. म्हणूनच आयएएस अधिकारी किंवा जिल्हाधिकारी हे पद सन्मानाचे समजले जाते. ही व्यक्ती महत्त्वाचे आणि जबाबदारीचे काम करणार असते. त्यांच्यावर जिल्ह्याची जबाबदारी आणि जोखीम असते. त्यामुळे या सुविधा कामातील सहजता असावी यासाठी असतात. जिल्हाधिकारी झाल्यावर जनहिताच्या गोष्टी, योजना, उपक्रम, सर्वसामान्य नागरिकाला पोहोचवायच्या आहेत, अशा उदात्त हेतूने या पदावर काम करणार अशी मनोकामना ठेवून विद्यार्थ्यांनी या पदासाठीची परीक्षा द्यावी. सुविधा हा भाग गौण असून कर्तृत्व आणि कामातील योगदान हा महत्त्वाचा भाग आहे. जिल्हाधिकाऱ्यांची नेमणूक राज्यशासन करत असते. विभागीय आयुक्त हे जिल्हाधिकाऱ्यांचे वरिष्ठ असतात.

पुढे काय होणार?

जिल्हाधिकारीपदाच्या अनुभवानंतर विभागीय आयुक्त, सचिव आदी वरिष्ठ पदांवर पदोन्नती होते.

कौशल्ये कोणती?

निर्णयक्षमता, कायद्याचा अभ्यास, शिस्त, आर्थिक पारदर्शक कारभार, नियोजनकौशल्य, नेतृत्व गुण, प्रशासनावरची पकड, संयम आदी गुणकौशल्ये असल्यास जिल्हाधिकारी होऊन काम करणे अधिक सोपे बनते. शालेय-महाविद्यालयीन जीवनापासून उत्तम अभ्यास, आकलन, वाचन, लेखन, टीमवर्क, संवादकौशल्ये, सामाजिक आशय, वक्तृत्व, सकारात्मकता, विकसित व्यक्तिमत्त्व अशा आघाड्यांवर काम केले असल्यास जिल्हाधिकारी होण्यासाठीचा पाया पक्का झाला असे म्हणता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bharat Taxi Cab Service : ‘ओला-उबर’ला मिळणार जबरदस्त टक्कर!, देशभरात आजपासून ‘भारत टॅक्सी’ कॅब सेवा सुरू

New York: न्यूयॉर्क शहराला मिळाला पहिला मुस्लिम महापौर; कुराण हातात घेऊन घेतली शपथ

KYV Process: वाहनधारकांना मोठा दिलासा! FASTag नियमात महत्त्वाचा बदल; डिजिटल टोल व्यवस्थेत सुधारणा

Video Viral: आईsss शप्पथ... हा तर स्विंगचा किंग! याच्या गोलंदाजीचा सामना करताना भल्याभल्यांना फुटेल घाम...

'बिग बॉस मराठी ६' मध्ये होणार 'या' अभिनेत्रीची एंट्री; रितेश देशमुखसोबत केलंय काम; कोण आहे ती?

SCROLL FOR NEXT