एज्युकेशन जॉब्स

रि-स्किलिंग : इंट्राप्रेन्युअरशिप

विनोद बिडवाईक

यशासारखे यश नसते असे म्हणतात. एखादा व्यवस्थापक, अधिकारी अथवा नेता यशस्वी झाला की मग तो खरा नेता म्हणून सर्वत्र ओळखला जातो. खूप पगार असणारे अधिकारी नेहमी प्रभाव पाडतातच असे नाही. सर्वांत मोठी चूक म्हणजे पूर्वीच्या अनुभवावर आधारित एखादा उमेदवार आपल्या संस्थेमध्ये यशस्वी होईल हे गृहीत धरणे. काही अधिकारी भरमसाट वेतनावर येतात, पैसे कमावतात आणि ३-४ वर्षात संस्था सोडून जातात. त्यांना त्यांचे वेतन मिळते, पण संस्थांना फारसा फायदा होत नाही. हा प्रकार सर्वसामान्यपणे हमखास घडतो. भरती करताना खूप गाजावाजा केला जातो, परंतु नंतर ते अपेक्षा पूर्ण करत नाहीत.

हे सर्व लोक चांगल्या संस्थेतील असतात. प्रतिथयश संस्थेमध्ये काम करण्याचा त्यांना अनुभव असतो. त्यांच्याकडे चांगले तांत्रिक, कार्यात्मक ज्ञान आणि चांगली सॉफ्ट स्किल्स असतात. त्यांचे सादरीकरण कौशल्य अप्रतिम असते. प्रेझेंटेशन स्किल्स, नेटवर्किंग स्किल्सच्या आधारे त्यांना संस्थांमध्ये चांगली पदे मिळतात. परंतु सर्वांत महत्त्वाचे कौशल्य, त्यांनी दुर्लक्ष केलेले असते, ते म्हणजे इंट्राप्रेन्युरल कौशल्ये.

आपल्या सर्वांना उद्योजकीय कौशल्ये माहीत आहेत. मात्र इंट्राप्रेन्युअरशिपकडे नेहमीच दुर्लक्ष केले जाते. हे कॉर्पोरेट्समध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी दाखविलेले कौशल्य आहे. जो कोणी मोठ्या संस्थेमध्ये उद्योजकतेच्या भावनेने वागतो त्याला इंट्राप्रेन्युअर म्हटले जाऊ शकते. स्वत:साठी जरी ते काम करत नसतील, परंतु संस्थेबद्दल त्यांची निष्ठा तर असतेच. परंतु ते सतत संस्थेकडे आपली स्वतःची संस्था म्हणून बघतात आणि सचोटीने संस्थेसाठी कार्य करत राहतात.

  • इंट्राप्रेन्युअरशिप ही एखाद्या संस्थेतील व्यक्तींना प्रेरित करण्याची आणि नंतर त्याचे प्रभावी योगदान घेण्याची पद्धत आहे. अशा कर्मचाऱ्यांना नेहमी काहीतरी वेगळे परंतु संस्थेच्या फायदाच काहीतरी करत राहावे. या व्यक्ती त्यांच्या स्वतःच्या प्रतिभेवर दृढ विश्वास ठेवतात आणि वारंवार स्वतःच काहीतरी करण्याची इच्छा बाळगतात.

  • त्यांना जबाबदारी हवी असते. ते सांगकामे नसतात. त्यांना संघटनात्मक रचनेत वैयक्तिक अभिव्यक्ती आणि अधिक स्वातंत्र्य हवे असते. इंट्राप्रेन्युअरशिपमध्ये जोखीम घेण्याची क्षमता आवश्यक असते.

  • ते प्रामुख्याने खालील कौशल्ये प्रदर्शित करतात.

  • त्यांना दूरदृष्टी असते, ते नेहमी नवनवीन कल्पना मांडतात.

  • ते जोखीम घेणारे असतात, ते चिकाटी ने काम करणारे असतात आणि जोपर्यंत स्वतःची उद्देश साध्य होत नाहीत तोपर्यंत शांत बसत नाहीत, ते स्वतःच्या मनाचा कोळ घेणारे आणि - विश्लेषणात्मक असतात, ते प्रामाणिक परंतु पूर्वापार चालत आलेल्या नियमांना आव्हान देतात; ते वास्तवाला सामोरे जाणारे असतात, आणि सतत अभिप्राय घेत राहतात.

इंट्राप्रेन्युअर हे संस्थेतील अंतर्गत उद्यम भांडवलदार असतात. ते जोखीम घेण्यासाठी आणि नावीन्यपूर्णतेद्वारे फायदेशीर उत्पादनात कल्पना बदलण्यासाठी ओळखले जातात. ते कोणत्या विभागात काम करतात हे महत्त्वाचे नाही. हे विक्री, विपणन, उत्पादन आणि एचआरमध्ये देखील असू शकतात. एखाद्या संस्थेमध्ये यशस्वी अधिकारी व्हायचे असेल तर इंट्राप्रेन्युअर हा महत्त्वाचा गुणधर्म ठरतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha Election Results Live : मतमोजणीला सुरुवात; उत्तर मध्य मुंबईतून उज्वल निकम यांनी घेतली आघाडी

India Lok Sabha Election Results Live : दोन्ही जागांवर राहुल गांधीची आघाडी...... सुरुवातीच्या कलमध्ये बघा कोण जिंकतंय NDA की INDIA?

Lok Sabha poll results: सुरुवातीचा पोस्टल मतांचा कल निकालाचे संपूर्ण चित्र का दाखवत नाहीत? जाणून घ्या

Lok Sabha Results Bengal Bomb Blast: लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी मोठा बॉम्ब स्फोट, पाच जण जखमी... नेमकं काय घडलं?

Lok Sabha: एक्झिट पोल कितपत ठरणार खरे? महाराष्ट्रात भाजप पुन्हा ठरणार मोठा भाऊ? शिंदे- अजित पवारांचं काय? मविआ कितीचा गाठणार टप्पा

SCROLL FOR NEXT