Army Sakal
एज्युकेशन जॉब्स

संधी करिअरच्या... : बारावीनंतर लष्करामध्ये अभियंता होण्यासाठी

बारावीनंतर अभियांत्रिकी शाखेकडे विद्यार्थ्यांचा वाढता ओढा आहे. मात्र, यासाठी भरमसाट फी देऊनही हव्या त्या अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळेल का नाही.

विवेक वेलणकर

बारावीनंतर अभियांत्रिकी शाखेकडे विद्यार्थ्यांचा वाढता ओढा आहे. मात्र, यासाठी भरमसाट फी देऊनही हव्या त्या अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळेल का नाही, याची चिंता विद्यार्थी आणि पालकांना सातत्याने भेडसावत असते. या सगळ्या पार्श्वभूमीवर मोफत अभियांत्रिकी शिक्षण, शिवाय निवास, भोजन, पुस्तकेही मोफत व शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मानाची आणि एक लाख रुपये महिना पगाराची नोकरी निश्चित देऊ शकणारे महाविद्यालय भारतात आहे, यावर कदाचित विश्वास बसणार नाही. भारतीय भूदलामध्ये लागणारे अभियंते घडवण्यासाठी सैन्यदलांमार्फत हे महाविद्यालय चालवले जाते.

कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग, पुणे

पुण्यात दापोडी येथे असलेल्या या महाविद्यालयात हा पाच वर्षांचा अभ्यासक्रम चालवला जातो. यातील पहिल्या वर्षी ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी, गया येथे मूलभूत लष्करी प्रशिक्षण दिले जाते. त्यानंतरची चार वर्षे पुणे/महू किंवा सिकंदराबाद येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियांत्रिकी प्रशिक्षण दिले जाते. चौथ्या वर्षी विद्यार्थ्यांना ५६००० रुपये महिना एवढे विद्यावेतन मिळते. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून पदवी मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांना भूदलामध्ये लेफ्टनंट म्हणून सामावून घेतले जाते. या महाविद्यालयात प्रवेशासाठी ९० जागा उपलब्ध असून त्यासंबंधीची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. ८ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावरून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येतील. ज्या विद्यार्थ्यांची जन्मतारीख २ जुलै २००२ ते १ जुलै २००५ या दरम्यान असेल आणि ज्या विद्यार्थ्यांना बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेत फिजिक्स, केमिस्ट्री व मॅथेमॅटिक्स या विषयात मिळून किमान ६० टक्के गुण असतील आणि ज्या विद्यार्थ्यांनी JEE (Mains) परीक्षा दिलेली असेल, ते हा अर्ज भरू शकतील. आलेल्या सर्व अर्जांची छाननी करून JEE (Mains) च्या मार्कांच्या आधारावर राष्ट्रीय पातळीवर गुणवत्ता यादी तयार केली जाते आणि निवडलेल्या विद्यार्थ्यांना डिसेंबर २०२१मध्ये मुलाखतीसाठी बोलावले जाते.

या महाविद्यालयातील प्रवेशासाठी मुलाखत (ज्याला SSB interview म्हणतात) हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. ही मुलाखत पाच दिवसांची असते, त्यात दोन टप्पे असतात. यामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीचा आढावा घेतला जातो. ज्यामध्ये विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्य, बौद्धिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य या सगळ्यांची कसून चाचणी घेतली जाते. मुलाखतीतून तावून सुलाखून निघालेल्या विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी केली जाते व त्यानंतर मेडिकल फिटनेस बघून त्यांना या महाविद्यालयांत प्रवेश दिला जातो. मेडिकल फिटनेस संबंधीची सविस्तर माहिती www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. जानेवारी २०२२ ला कोर्स सुरू होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Ministers: मंत्री घेणार आलिशान गाड्या; राज्यपाल अन् मुख्यमंत्र्यांसाठी तर मर्यादाच नाही, किती पैसे मंजूर?

Latest Maharashtra News Updates : सुसगावकडे जाणारी बस पाण्याचा अंदाज न आल्याने थेट खड्यात अडकली

Nashik News : नवरात्रोत्सव सुरू होण्याआधी भगूरमधील रस्त्यांची दुरवस्था; भाविकांना त्रासाला सामोरे जावे लागणार

Chakur News : सहकारमत्र्यांकडून कृषी कार्यालयाचा पंचनामा; कृषी अधिकाऱ्यासह सात कर्मचारी गैरहजर

Nashik Railway Station : नाशिक रेल्वे स्थानक कुंभमेळ्यासाठी सज्ज होणार; रेल्वे प्रशासनाची तयारी सुरू

SCROLL FOR NEXT