career options after 12th arts,  Sakal
एज्युकेशन जॉब्स

12th arts Careers: बारावीनंतर आर्ट्सच्या विद्यार्थ्यांसाठी खास करिअर ऑप्शन्स, वाचा एका क्लिकवर

What are the best career options for 12th arts students in India: जर तुम्हाला कला क्षेत्राची आवड असेल आणि तुम्हाला आयुष्यात काहीतरी वेगळे करायचे असेल तर तुमच्यासाठी कला क्षेत्र हे एकदम परफेक्ट आहे.

सकाळ वृत्तसेवा

12th arts Careers: जर तुम्हाला कला क्षेत्राची आवड असेल आणि तुम्हाला आयुष्यात काहीतरी वेगळे करायचे असेल तर तुमच्यासाठी कला क्षेत्र हे एकदम परफेक्ट आहे. १२ वी नंतर कला या क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी तुमच्यासाठी उपलब्ध होऊ शकतात. तुमच्या आवडीनुसार या क्षेत्रात तुम्हाला अनेक पर्याय उपलब्ध होतील.

१२ वी नंतर कला या क्षेत्रात तुम्ही साहित्य, कला, सामाजिक विज्ञान, तत्वज्ञान आणि भूगोल इत्यादी विषयांमध्ये करिअर करू शकता. चला तर मग आज आपण या क्षेत्रातील काही हटके करिअर ऑप्शन्सबद्दल जाणून घेऊयात.

बॅचलर ऑफ सोशल वर्क

बॅचलर ऑफ सोशल वर्क हा ग्रॅज्युएशन लेव्हलचा कोर्स आहे. जर तुम्हाला सामाजिक क्षेत्रात काम करण्याची आवड आणि इच्छा असेल तर हा कोर्स तुमच्यासाठी अतिशय योग्य आहे. समाजातील प्रश्न सोडवणे, समाजात सुधारणा घडवून आणणे आणि सामाजिक न्यायाला चालना देणे हा या अभ्यासक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.

ही पदवी घेतल्यानंतर विद्यार्थी सामाजिक सेवा प्रदान करणाऱ्या विविध सामाजिक संस्थांमध्ये काम करू शकतात. तुम्हाला समाजातील विविध वयोगटांमध्ये जसे की, लहान मुले, तरूण, वृद्ध आणि दिव्यांग व्यक्तींसोबत काम करण्याची संधी मिळते.

इंटेरिअर डिझायनिंग डिप्लोमा

मागील काही वर्षांपासून इंटेरिअर डिझायनिंग या क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. शिवाय, अनेक नवनवीन संकल्पना आणि डिझाईन्सची या क्षेत्रात भर पडत असून नागरिकांचा ही याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे, इंटेरिअर डिझायनरला कामाच्या अमाप संधी या क्षेत्रात उपलब्ध आहेत.

जर तुम्हाला या क्षेत्राची आवड असेल आणि घर सजवायला तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही १२ वी नंतर इंटेरिअर डिझायनिंगचा डिप्लोमा करू शकता. या डिप्लोमामध्ये विद्यार्थ्यांना घर, ऑफिस आणि व्यावसायिक जागांना आकर्षक आणि उपयुक्त बनवण्यासाठी आवश्यक कौशल्ये प्रदान केली जातात. इंटेरिअर डिझायनिंगचे प्राथमिक ज्ञान, फर्निचर डिझायनिंग, आर्किटेक्चर स्किल्स इत्यादी कौशल्ये या डिप्लोमामध्ये शिकायला मिळतात.

फॉरेन लॅंग्वेज डिप्लोमा

आजकाल फॉरेन लॅंग्वेजला भरपूर मागणी वाढली आहे. मागील काही वर्षांमध्ये भारतीय भाषांसोबतच आता परदेशी भाषांकडे देखील कल वाढताना दिसत आहे. शिवाय, अनेक आयटी कंपन्यांमध्ये फॉरेन लॅंग्वेज अवगत असलेल्यांना कामाच्या संधी उपलब्ध आहेत.

१२ वी नंतर तुम्ही फॉरेन लॅंग्वेज डिप्लोमा करू शकता. हा डिप्लोमा केल्यानंतर तुम्हाला अनेक प्रकारच्या कामाच्या संधी मिळू शकतील. हा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर तुम्ही भाषा शिक्षक, अनुवादक म्हणून ही काम करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: गणेशभक्तांना दिलासा! मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक रद्द, विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय; पहा वेळापत्रक

CM Devendra Fadnavis : ‘’गणरायाकडे एकच मागणे मागायचे असते ते म्हणजे..’’ ; जाणून घ्या, मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?

Ajit Pawar : प्रभाग रचनेवर आता रडत बसू नका; निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा

Mumbai Local: २००हून अधिक लोकल फेऱ्या वाढणार, प्रवाशांना दिलासा मिळणार; रेल्वे प्रशासनाची योजना काय?

Latest Marathi News Updates : देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT