Shivaji Maharaj  google
एज्युकेशन जॉब्स

Shivaji Maharaj : इयत्ता चौथीच्या पुस्तकात शिवाजी महाराजांना अढळ स्थान कसं प्राप्त झालं ?

तेव्हापासून चौथीच्या पुस्तकाचा मूळ गाभा तसाच ठेवून त्यात थोडेफार बदल करण्यात येतात. पण या पुस्तकात शिवाजी महाराजांना अढळ स्थान आहे.

नमिता धुरी

मुंबई : तुमचं प्राथमिक शिक्षण महाराष्ट्र बोर्डात झालं असेल तर तुम्हाला आठवत असेल की, इयत्ता चौथीत असताना इतिहास विषयाचं संपूर्ण पुस्तक शिवाजी महाराजांना समर्पित केलेलं असायचं.

शिवाजी महाराजांच्या बालपणापासून ते निधनापर्यंत त्यांच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाचे प्रसंग या पुस्तकात सांगितलेले होते. ते एक पुस्तक वाचलं की महाराजांचं अख्खं चरित्र कळायचं.

पुढे काळ बदलला, पिढ्या बदलल्या तसा सर्व विषयांचा अभ्यासक्रमही बदलत गेला. पण चौथीच्या पुस्तकातून शिवाजी महाराज मात्र कधीच बाहेर पडले नाहीत. असं का बरं होत असेल ? (why ssc board never changes the history textbook of 4th standard which consists of shivaji maharaj life journey ) हेही वाचा - ट्रेडिंग कुठल्याही प्रकारचे असो 'स्टाॅप लाॅस' हवाच

१९९१ साली तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या कार्यकाळात चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकात काही बदल करण्यात आले होते. त्यावेळी वाद निर्माण झाला होता आणि त्याची परिणती म्हणून विधिमंडळात एक ठराव झाला.

या ठरावानुसार चौथीच्या पुस्तकातून शिवाजी महाराजांचा इतिहास कधीच पुसला जात नाही.

१९७० साली इतिहासाच्या पुस्तकाचा अभ्यासक्रम निश्चित करण्यात आला होता. तेव्हापासून चौथीच्या पुस्तकाचा मूळ गाभा तसाच ठेवून त्यात थोडेफार बदल करण्यात येतात. पण या पुस्तकात शिवाजी महाराजांना अढळ स्थान आहे.

चौथीच्या पुस्तकात शिवाजी महाराजांचे संपूर्ण चरित्र गोष्टीरुपात मांडण्यात आले आहे. महाराष्ट्र शिक्षण मंडळातून शिकून पुढे गेलेल्या कित्येक पिढ्यांना हे पुस्तक चांगले आठवत असेल.

बालभारतीतर्फे प्रकाशित केले जाणारे पुस्तक त्यांच्या संकेतस्थळावर पीडीएफ स्वरुपात उपलब्ध आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT