Work From Home Sakal
एज्युकेशन जॉब्स

नोकरीवर घेतानाच ‘वर्क फ्रॉम होम’ची अट

कामगारांची सुरक्षा लक्षात घेऊन कोरोनाच्या पहिल्या-दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात आयटीयन्सला घरून काम देण्यात आले होते.

सकाळ वृत्तसेवा

कामगारांची सुरक्षा लक्षात घेऊन कोरोनाच्या पहिल्या-दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात आयटीयन्सला घरून काम देण्यात आले होते.

पुणे - कोरोनामुळे (Corona) आमच्या कंपनीची कामाची पद्धत (Company Work Process) बदलली आहे. कर्मचाऱ्यांना (Employee) शक्यतो घरूनच काम देण्यात येत आहे. त्यामुळे तुम्हाला देखील ‘वर्क फ्रॉम होम’ (Work From Home) करावे लागेल. गरज असल्याच आम्ही तुम्हाला ऑफिसला (Office) बोलावू, अशी अट आता आयटी कर्मचाऱ्यांना (IT Employee) कामावर घेताना घातली जात आहे. कोरोनामुळे सुरू झालेली ही कार्यपद्धती आता अनेक कंपन्यांनी कायमस्वरूपी अवलंबली आहे.

कामगारांची सुरक्षा लक्षात घेऊन कोरोनाच्या पहिल्या-दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात आयटीयन्सला घरून काम देण्यात आले होते. एप्रिलपासून शहरातील आयटी कंपन्यांतील ६० टक्के कर्मचारी कार्यालयात तर ४० टक्के कर्मचारी घरूनच काम करतील, असा अंदाज या क्षेत्रातील कामगार संघटनांनी व्यक्त केला आहे. बदललेले हे वर्क कल्चर काही कंपन्यांनी कायमस्वरूपी राबविण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे अनेक कंपन्या आता नवीन कर्मचाऱ्यांना कामावर घेतानाच तुम्हाला यापुढे कायमस्वरूपी घरूनच काम करावे लागेल. त्यासाठी आवश्‍यक असलेला सेटअप खर्च दिला जार्इल. यांसह विविध अटी असलेला करारच कर्मचाऱ्यांबरोबर करून घेत आहे.

पुण्यात घर नसलेल्या कर्मचाऱ्यांनी या पर्यायाचे स्वागत केले आहे. कारण, त्यांचा पुण्यात राहण्यासाठीचा खर्च वाचत असून मूळ गावावरून काम करण्याचा आनंद त्यांना घेत येत आहे. या निर्णयाला विरोध करणाऱ्यांची संख्या कमी असल्याचे पाहायला मिळते. हीच स्थिती आधीपासून काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांची आहे. कोरोनानंतर सुरू झालेले अनेकांचे वर्क फ्रॉम होम अद्याप सुरू आहे. यापुढेही तुम्ही घरूनच काम करा, असे विद्यमान कर्मचाऱ्यांना सांगण्यात आले आहे. मात्र त्यांना सेटअप खर्च देण्याबाबत दुजाभाव केल्याचे अनेक उदाहरणे आहेत.

कोरोनापुर्वी दररोज ऑफिसला जाऊन काम करणे हा एकच पर्याय होता. मात्र, कोरोना सुरू झाला तेव्हापासून आम्हाला वर्क फ्रॉम होम दिले आहे. आता देखील हीच कार्यपद्धती असून तुम्हाला कायमस्वरूपी घरूनच काम करावे लागेल, असे कंपनीकडून सांगण्यात आले. त्यामुळे गेल्या दोन वर्षांत मी केवळ तीन वेळा आॅफिसच्या कामानिमित्त पुण्यात आलो आहे. सध्या मी घरूनच काम करीत आहे. गरज असेल तेव्हा तुम्हाला ऑफिसला बोलविण्यात येर्इल, असे मला सांगितले आहे.

- संदीप घेरत, आयटीयन्स

पुण्यात घर नसलेल्यांची चांदी

शहरातील आयटी कंपन्यांमध्ये कार्यरत असलेल्या परराज्यातील किंवा दुसऱ्या शहरातील कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे. यातील प्रत्येकाचे घर पुण्यात नाही. त्यामुळे पुण्यात घर नाही व वर्क फ्रॉम होम दिले आहे, अशा आयटीयन्सची यासर्वांत चांदी झाली आहे. कारण त्यांचा पुण्यात राहण्याचा खर्च वाचत आहे. तसेच काम करताना कुटुंबीयांसोबतही वेळ घालवता येत आहे. त्यामुळे पुण्यात घर नसलेल्या अनेकांची आजही घरून काम करण्याला पसंती आहे.

नवीन कर्मचारी घेताना करारातील मुद्दे

  • कंपनी सांगेल तोपर्यंत किंवा कायमस्वरूपी घरून काम करावे लागेल

  • घरून काम करण्यासाठी आवश्‍यक असलेला सेटअप खर्च दिला जाणार

  • खर्च मिळण्यासाठी खरेदी केलेल्या वस्तूंचे बिल सादर करावे

  • गरज असेल तेव्हा काही दिवस आधी कल्पना देऊन हजर होण्याची सूचना दिली जाईल

  • ऑफिसला बोलवल्यास येण्या-जाण्याचा खर्च दिला जाईल किंवा नाही

  • १२०० ते १३०० पुणे व पिंपरी परीसरातील आयटी कंपन्या

  • साडेपाच ते सहा लाख आयटीयन्सची संख्या

  • सुमारे दीड लाख वर्क फ्रॉम होम असलेले कर्मचारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who was Sandu Karhale? : मराठवाडा मुक्ती संग्रामातील धगधगता तारा हरपला! ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक सांडू कऱ्हाळे यांचे वयाच्या 100 व्या वर्षी निधन, निल्लोडवर शोककळा

Gold Silver Price : सोने-चांदी झाले स्वस्त; एका दिवसात सोने ५ हजारने तर चांदी ४ हजार ९०० रुपयांनी घसरली

Latest Marathi News Update : खालापूर जवळील इमॅजिका पार्कमध्ये 47 वर्षीय पर्यटकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Fatty Liver: भारतात झपाट्याने वाढतोय फॅटी लिव्हरचा धोका! अशी ओळखा लक्षणे...

What Action Will Tukaram Mundhe Take? बनावट दूध पावडरचे मोठे रॅकेट अन् अधिकाऱ्यांचे हात गुंतल्याचा संशय; सिन्नरमधील 'त्या' घोटाळ्याची मुंढेकडे लेखी तक्रार, काय कारवाई होणार?

SCROLL FOR NEXT