Adv. Yashomati Thakur esakal
एज्युकेशन जॉब्स

'बाबासाहेब आंबेडकर जिथं शिकले, त्या शाळेत सुविधा उपलब्ध करणार'

उमेश बांबरे

'श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह हायस्कूलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्राथमिक शिक्षण झाले.'

सातारा : श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह हायस्कूलमध्ये (Chhatrapati Pratapsingh High School) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचे प्राथमिक शिक्षण झाले आहे. या शाळेत येण्याचे भाग्य मला लाभले. या शाळेने अनेक थोर व्यक्ती घडविल्या असून, ही शाळा ऐतिहासिक असून, याचे जतन केले पाहिजे. या शाळेत विविध सोयी-सुविधा उपलब्ध केल्या जातील, असा विश्वास महिला व बालविकासमंत्री ॲड. यशोमती ठाकूर (Adv. Yashomati Thakur) यांनी व्यक्त केला.

Adv. Yashomati Thakur

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्राथमिक शिक्षण झालेल्या श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह हायस्कूलला महिला व बालविकासमंत्री ॲड. ठाकूर यांनी भेट देऊन शाळेची पाहणी केली. या वेळी जिल्हा कार्यक्रम अधिकारी (बालकल्याण) रोहिणी ढवळे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विजय तावरे यांच्यासह शिक्षण विभागातील अधिकारी, तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

ॲड. ठाकूर म्हणाल्या, ‘‘श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह हायस्कूलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्राथमिक शिक्षण झाले. त्या शाळेत येण्याचे मला भाग्य लाभले. या शाळेने अनेक थोर व्यक्ती घडविल्या आहेत. ही शाळा ऐतिहासिक असून, याचे जतन केले पाहिजे. डॉ. आंबेडकर यांनी आपल्याला संविधान दिले आहे. या संविधानामुळे सर्वांना समान जगण्याचा हक्क दिला आहे. डॉ. आंबेडकर यांचे प्राथमिक शिक्षण झालेल्या शाळेत आल्यानंतर सकारात्मक ऊर्जा मिळाली आहे. राज्य शासन त्यांच्याच विचारांवर काम करीत असून, शाळेच्या सोयी-सुविधांसाठी प्रयत्न करणार आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident: ससूनमधून परतले, जेवणासाठी महामार्गावर उतरले; काही क्षणांतच सहाय्यक फौजदारावर काळाचा घाला, अज्ञात वाहनाची धडक अन्..

Latest Marathi News Update : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात दोषारोपपत्र दाखल

मामा-भाच्यात असं काय घडलं? राजगुरूनगरमध्ये धक्कादायक घटना |

Rohit Sharma: वडापाव नाही, तर टेन्शनच्या वेळी आईच्या हातचा 'हा' पदार्थ आहे कम्फर्ट फूड; रोहितने केला खुलासा

Satara Accident News: ४६ दिवस मृत्यूशी झुंज; बंगळूर महामार्गावरील अपघातात गंभीर जखमी प्रतीक काळभोरचा अखेर मृत्यू, एकुलता एक मुलगा गमावला

SCROLL FOR NEXT