AIMIM Wins in Municipal Election
esakal
AIMIM municipal election success with major wins in Chhatrapati Sambhajinagar : राज्यभरात महापालिका निवडणुकीत भाजप जरी सर्वात मोठा पक्ष ठरला असला, तरी एमआयएमने देखील अनेक जागांवर जोरदार मुंसडी मारली आहे. सध्या हाती आलेल्या माहितीनुसार 29 पैकी 13 महापालिकांत एमआयएमचे 95 नगरसेवक विजयी झाले आहेत.
विशेष म्हणजे शिवसेना-भाजपचा गड मानल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमचे सर्वाधिक २४ उमेदवार विजयी झाले आहेत. या ठिकाणी एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झालेली होती. प्रचारादरम्यान त्यांच्यावर हल्ला झाल्याचीही घटना घडली होती.
याशिवाय, मालेगावमध्ये एमआयएमचे २० उमेदवार विजयी झाले असून, सोलापूर, धुळे,नांदेडमध्ये प्रत्येकी ८ असे २४ उमेदवार विजयी झाले आहेत. याचबरोबर मुंबईत एमआयएमचे आतापर्यंत ६ नगरसेवक विजयी झाल्याची माहिती समोर आली आहे. समाजवादी पार्टीला मागे सारत एमआयएमची सरशी झाल्याचे चित्र आहे. याचबरोबर एमआयएमचे अमरावतीत ६, ठाण्यात ५, नागपुरात ४ नगरसेवक विजयी झाल्याची माहिती समोर आली आहे.
तर छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिका निवडणडणुकीत भाजप सर्वाधिक जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरत आहे. तर त्या पाठोपाठ शिवसेना दुसऱ्या क्रमामांकवर आहे. दुसरीकडे ठाकरे गट मात्र तिसऱ्या क्रमांकावर दिसत आहे. दरम्यान, पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या दोन्ही मुलांचा या निवडणुकीत विजय झाला आहे.
प्रभाग क्रमांक १८ मध्ये हर्षदा शिरसाट या विजयी झाल्या आहेत. तर प्रभाग क्रमांक २९ मधून सिद्धांत शिरसाट विजयी झाले आहेत. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांचे बंधू राजेंद्र दानवे हे मात्र प्रभाग क्रमांक १६ मध्ये पराभूत झाले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.