AIMIM chief and MP Asaduddin Owaisi addressing the media after clearly stating that his party will not support the BJP or NDA alliance in Maharashtra
esakal
AIMIM Maharashtra and BJP NDA Alliance : महाराष्ट्रातील २९ महापालिकांचे निकाल काल जाहीर झाले. यामध्ये भाजप सर्वाधिक जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे. मुंबईतही भाजप-शिवसेना महायुतीचाच महापौर बसणार असल्याचे आता स्पष्ट झालेले आहे. तर राज्यभरातील जवळपास २५ महापालिकांमध्ये भाजप किंवा महायुतीचा महापौर असेल असं मुख्यमंत्री फडणवीसांनी काल निकालानंतर प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं.
यंदा महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांमध्ये विशेष लक्षवेधी बाब ठरली ती ओवैसींच्या एमआयएमने मारलेली जोरदार मुसंडी. कारण, एमआयएमचे महाराष्ट्रातील २९ पैकी १३ महापालिकांमध्ये १२५ नगरसेवक विजयी झाले आहेत. विशेष म्हणजे भाजप-शिवसेनेचा बालेकिल्ला म्हटल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमचे ३३ नगरसेवक विजयी झाले आहेत, तर मुंबईत आठ नगरसेवक निवडून आले आहेत.
महाराष्ट्रातील या घवघवीत यशानंतर एमआयएमचे प्रमुख खासदार ओवैसी यांनी महाराष्ट्रातील आगामी महापौर निवडणुकांमध्ये त्यांच्या पक्षाची नेमकी काय भूमिका असेल, भाजप किंवा विरोधकांना ते पाठिंबा देणार का? याबाबतची त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.
ओवैसींनी म्हटले आहे की, भाजप किंवा एनडीएला पाठिंबा देण्याचा प्रश्नच येत नाही. याचवेळी त्यांनी सत्ताधारी किंवा विरोधक यापैकी कुणालाही पाठिंबा देणार नसल्याचे स्पष्ट केले. तसेच, राज्यभरातील त्यांच्या नगरसेवकांनाही सूचना केली आहे की, कुणीही पक्ष निर्णया व्यतिरिक्त वैयिक्तक निर्णय घेऊ नये. यावेळी त्यांनी महाराष्ट्रात त्यांच्या पक्षाला मिळालेल्या यशाबद्दल समस्त जनतेचेही आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.