Asaduddin Owaisi Esakal
Election News

यूपीत भाजपाचा झेंडा; असदुद्दीन ओवेसी म्हणाले, ये कामयाबी है...

उत्तर प्रदेशात संपूर्ण विजयाचे धनी भाजप नाही-असदुद्दीन ओवेसी

सकाळ डिजिटल टीम

लखनऊ: पाच राज्याच्या निवडणूक निकालात चार राज्यात भाजपाने बाजी मारली आहे. त्यातच उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत (Uttar Pradesh Assembly Election 2022 Result) भारतीय जनता पक्षाने (BJP) पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने दणदणीत विजय मिळवला आहे. सध्या उत्तर प्रदेशात या विजयाचे जल्लोषी स्वागत होत आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) आणि भाजपाचे इतर नेते गुलालची उधळन करत आनंदोत्सव साजरा करत आहेत. एमआयएम पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी भाजपवर टीका केली आहे. हा विजय भाजपाचा पूर्ण विजय नाही तर नागरीकांना भूरळ पाडून पदरात पाडलेले यश आहे असे टीकास्त्र ओवेसींनी सोडले.

भाजपवर निशाणा साधताना असदुद्दीन ओवेसी म्हणाले, राजकीय पक्ष आपले अपयश लपवण्यासाठी ईव्हीएमसाठी मशीनमध्ये घोटाळा असेल अशी सारवासारव करतात. मात्र मी २०१९ पासून सांगतो आहे की ही ईव्हीएमची चूक नाही तर नागरीकांच्या मनात एक चिफ टाकण्यात आली आहे ज्यामुळे उत्तर प्रदेशात योगींचा नारा लागतो आहे. खरतर ही त्यांची चूक आहे असा आरोप ओवीसींनी केला.

भाजपाला मिळालेल्या यशाबद्दल बोलताना ओवेसी म्हणाले, भाजपाने आज जे यश मिळवले आहे ते यश पूर्ण त्यांचे नाही. तर त्यांनी नागरीकांच्या मनाशी खेळून त्यांनी निवडून आणण्यासाठी भाग पाडल आहे. याच्या जोरावरच त्यांनी विजय मिळवला आहे. उत्तर प्रदेशचा संपूर्ण विजयाचे ते धनी नाहीत असा निशाणा त्यांनी लगावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT