Election News

MP Election 2023: प्रियंका गांधींकडून PM मोदींची सलमान खानशी तुलना; प्रचार सभांमध्ये टिका-टिप्पण्यांचा ऊत

देशात सध्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची प्रचाराला चांगलाच जोर चढला आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : देशात सध्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची प्रचाराला चांगलाच जोर चढला आहे. राजकीय पक्षांकडून एकमेकांविरोधात आरोप-प्रत्यारोप आणि टीका-टिप्पण्या होत आहेत.

या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सध्याच्या प्रचार सभांवर टीका करताना त्यांची तुलना थेट बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्यासोबत केली आहे. (Priyanka Gandhi compares PM Modi to Salman Khan Election Rallies flooded with comments)

सलमान खान कायम रडत असतो...

काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी प्रियंका गांधी यांची मध्य प्रदेशातील भाषणाची क्लीप ट्विट केली आहे. तसेच यात म्हटलं की, ज्या प्रमाणं 'तेरे नाम' या सिनेमात सलमान खान कायम रडत असतो. त्याचप्रमाणं मोदी देखील कायम रडत असतात. त्यांच्यावर आता 'मेरे नाम' नावाचा सिनेमा बनवायला हवा. प्रियंका गांधींचं हे विधान म्हणजे 'एपिक रोस्ट' आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे. (Latest Marathi News)

प्रियंका गांधींनी नेमकं म्हटलंय काय?

प्रियंका गांधी एका सभेला संबोधित करताना म्हणतात की, मोदींचं आता काय विचारूच नका! मोदी देशातील असे एकमेव पंतप्रधान आहेत ते कायमस्वरुपीच स्वतःलाच त्रासामुळं वैतागलेले असतात.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीवेळी प्रचार सभेत ते मोठी यादी घेऊन गेले की बघा मला काँग्रेसवाल्यांनी इतक्या शिव्या दिल्या. आता इथं देखील ते प्रचार करताना सांगत आहेत की मला इतक्या शिव्या दिल्या. ते काय रडत असतात. (Marathi Tajya Batmya)

मोदींसाठी 'मेरे नाम' सिनेमा बनवायला हवा

तुम्ही कधी सलमान खानचा सिनेमा पाहिलात का? 'तेरे नाम'! यामध्ये सलमान खान सुरुवातीपासून शेवटपर्यंत रडतच असतो. मी तर म्हणते मोदींसाठी पण सिनेमा बनवून टाकू त्याचं नाव ठेवू 'मेरे नाम'. पण मोदी हे लोकांना ओळखण्यात टॉप क्लास आहेत.

जगभरातील गद्दार आणि भेकड लोकांना एकत्र करुन आपल्या पक्षात घेतलंय त्यांनी. मला तर बिचाऱ्या आरएसएस आणि भाजपच्या चांगल्या कार्यकर्त्यांची कीव येते, जे अनेक वर्षांपासून आपल्या पक्षासाठी संघर्ष करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नगराध्यक्षांची निवड जनतेतूनच! दिवाळीतच वाजणार निवडणुकांचा बिगुल; पहिल्या टप्प्यात नगरपालिका किंवा झेडपी, पंचायत समित्यांची निवडणूक

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात बनवा हेल्दी एग रोल, पाहा रेसिपीचा Video

आजचे राशिभविष्य - 03 ऑक्टोबर 2025

अग्रलेख : अस्वस्थ स्वातंत्र्ययोद्धा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 03 ऑक्टोबर 2025

SCROLL FOR NEXT