BMC sakal media
Election News

मुंबई महापालिका निवडणूक एप्रिलमध्ये ?

समीर सुर्वे

मुंबई : मुंबई महानगर पालिकेच्या (BMC Election) आगामी निवडणुका एप्रिल महिन्यात होण्याची शक्‍यता आहे. तर, महानगरपालिकेची मुदत 8 मार्च रोजी संपणार आहे. त्यामुळे या कालावधीत महानगरपालिकेचा संपूर्ण कारभार आयुक्तांच्या (bmc commissioner) हातात जाण्याची शक्‍यता आहे. मुंबईतील प्रभागारांच्या सुधारीत रचनेचा मसुदा उद्या 1 फेब्रुवारी रोजी जाहीर होणार आहे. त्यानंतर सूचना व हकरती मागवून ही प्रक्रिया 2 मार्चपर्यंत चालणार आहे.

यानंतर पुन्हा प्रभागांचे आरक्षण निश्‍चित करुन त्यावर सूचना व हकरती मागवाव्या लागणार आहेत. या प्रक्रियेत मार्च महिन्याचा पहिला पंधरावडा संपण्याची शक्‍यता आहे.तर,दुसऱ्या बाजूला महानगरपालिकेची मुदत 8 मार्च रोजी संपणार आहे. मात्र, त्यापूर्वी महानगरपालिकेची निवडणूक होण्याची शक्‍यता नाहीच. निवडणुकीच्या तारखेच्या 45 दिवस आचारसंहिता जाहीर करावी लागणार असल्याने निवडणूक एप्रिल महिन्यात किंवा मे महिन्यात होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे पालिकेची मुदत संपल्यावर नगरसेवक बरखास्त होऊन कारभार महानगर पालिका प्रशासनाच्या हाती जाण्याची शक्‍यता आहे.

यापूर्वी 1992 ला महानगर पालिकेला दोन वर्षांची मुदत दिली होती.मात्र,आता केंद्र सरकार पासून राज्याच्या विविध कायद्यात बदल झाल्याने महानगर पालिकेला मुदतवाढीची शक्‍यता कमीच असल्याचे मानले जात आहे.तसे,संकेतही पालिका प्रशासनाकडून मिळत आहे.

अंतिम निर्णय राज्य सरकारचा

मुंबईला विशेष बाब म्हणून अंतिम निर्णय राज्य सरकारकडून घेतला जाऊ शकतो.राज्यात आणि महानगर पालिकेत शिवसेनेची सत्ता आहे.त्यामुळे नगरसेवकांना मुदतवाढ देण्याचा विचार केला जाऊ शकतो.मात्र,प्रशासनाच्या हाती कारभार झाल्यावर त्यावर थेट अंकुश राज्य सरकारचा राहाणार आहे.मुंबई शेजारील नवी मुंबई आणि वसई विरार महानगर पालिकेत सध्या प्रशासक आहे. मात्र,या दोन्ही महानगर पालिकेत शिवसेनेचे फारसे अस्तीत्व नाही.त्यामुळे मुंबई महानगर पालिके बाबत राज्य सरकार याबाबत काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT