Yediyurappa raghvendra and yajuvendra
Yediyurappa raghvendra and yajuvendra sakal
Election News

BS Yediyurappa : येडियुराप्पांचा करिष्मा मुलांसाठी उपयोगी?

रवींद्र मंगावे

येडियुराप्पांना आपल्या संघर्षमय राजकीय जीवनाचा शेवट गोड झाला नसल्याची खंत आहे. त्यामुळेच त्यांनी आपल्या मुलांना राजकारणात संघर्ष करावा लागू नये, ही त्यांची इच्छा आहे.

भाजपला पहिल्यांदा दक्षिण दिग्विजय करविणारे दिग्गज नेते म्हणजे बुकनकेरे सिद्धलिंगय्या तथा बी. एस. येडियुराप्पा. कर्नाटकात भाजप म्हणजे येडियुराप्पा आणि येडियुराप्पा म्हणजे भाजप असा काही काळ राहिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाची पंतप्रधानपदासाठी शिफारस करणाऱ्या पहिल्या नेत्यांपैकी एक असलेले येडियुराप्पा आज पंच्याहत्तरी ओलांडल्यामुळे पक्षाने त्यांना थांबण्याचा सल्ला दिला. आता त्यांची दोन मुले सक्रिय राजकारणात आहेत. एक लोकसभेत प्रतिनिधित्व करत आहे, तर दुसऱ्याला विधानसभेत पाठविण्यासाठी येडियुराप्पांची कसरत सुरू आहे.

येडियुराप्पांना आपल्या संघर्षमय राजकीय जीवनाचा शेवट गोड झाला नसल्याची खंत आहे. त्यामुळेच त्यांनी आपल्या मुलांना राजकारणात संघर्ष करावा लागू नये, ही त्यांची इच्छा आहे. म्हणूनच दक्षिणेत सत्ता मिळविल्यानंतरही अलीकडच्या काळात पक्षाकडून होत असलेला अन्याय त्यांनी लवकर ओळखला. म्हणून त्यांनी दोनवेळा पक्षापेक्षा स्वतःच्या जीवावर राज्यात सत्ता स्थापन केली. आता येडियुराप्पा हे सक्रिय राजकारणातून बाहेर गेले असतानाही पक्षाला त्यांची शेवटच्याक्षणी आठवण झाली. पुन्हा त्यांना प्रचारासाठी सक्रिय केले आहे. पण, उमेदवारीसाठी आपल्या काही नेत्यांना उमेदवारी मिळवून देण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागत आहे.

शिमोगा जिल्ह्यातील शिकारीपूर मतदारसंघ म्हणजे येडियुराप्पा यांचा बालेकिल्ला. १९८३ पासून आठवेळा शिकारीपूर मतदारसंघातून ते सलग विजयी झाले आहेत. चारवेळा मुख्यमंत्री बनले. २००८ मध्ये भाजपसाठी सुवर्णक्षण ठरला होता. पहिल्यांदा भाजपचा मुख्यमंत्री कर्नाटकात येडियुराप्पा यांच्या रूपाने मिळाला. २०११ मध्ये त्यांच्यावर खाण घोटाळ्यातील आरोप झाले. त्यामुळे त्यांना पायउतार व्हावे लागले. भ्रष्टाचाराच्या आरोपातून मुक्त झाल्यानंतरही पक्षाने त्यांना पद देण्याचा विचार न केल्याने त्यांनी कर्नाटक जनता पक्ष स्थापन केला. हा भाजपसाठी मोठा धक्का होता. लिंगायत समाजाची व्होट बॅंक पाठीशी असल्याने त्याचा सर्वात मोठा फटका भाजपला बसणार होता. त्याप्रमाणे येडियुराप्पा यांच्या पक्षाने २०१३ च्या निवडणुकीत २०३ जागा लढवून केवळ आठ जागांवर विजय मिळविला. पण, या निकालात भाजपला येडियुराप्पाने मोठा धक्का दिला. भाजपच्या ७० हून अधिक जागा कमी फरकाने पराभूत झाल्या.

त्यांना केवळ ४० जागा जिंकता आल्या. त्यावेळी पक्षालाही येडियुराप्पांचे महत्त्‍व कळल्याने त्यांना पुन्हा हाक घातली. कर्नाटक जनता पक्ष भाजपमध्ये विलीन केला गेला. २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा भाजपने मुसंडी मारत १०५ जागा मिळविल्या. पण, काठावरचे बहुमत असल्याने येडियुराप्पा यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊनही बहुमत सिद्ध करता आले नाही. त्यानंतर धजद व काँग्रेस युतीचे सरकार आले. येडियुराप्पा यांना पराभवाची सल खुपत होती.

त्यांनी २०१९ ला पुन्हा ऑपरेशन कमळ राबवून काँग्रेस व धजदचे १७ आमदार फोडून सत्ता मिळविली. २०२१ ला वयाचा दाखला देत पक्षाने त्यांना थांबविले. २६ जुलै २०२१ रोजी दुसऱ्या वर्षपूर्ती कार्यक्रमातच त्यांना निरोपाचे भाषण करावे लागले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT