Show Cause Notice Issued to Bhai Jagtap Sparks Political Debate
esakal
Bhai Jagtap show cause notice : महाराष्ट्रातील २९ महापालिका निवडणुकांचे निकाल काल जाहीर झाले आहेत. राज्यात सर्वाधिक जागा जिंकून भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे. एवढच नाहीतर मुंबईत देखील भाजपच सर्वात जास्त जागा जिंकणार पक्ष आहे. एकीकडे भाजपच्या वाट्याला घवघवीत यश आलेलं असताना, दुसरीकडे राज्यात काँग्रेसची अवस्था मात्र अतिशय बिकट असल्याचे दिसत आहे. यानंतर आता काँग्रेसमधील अंतर्गत कलह समोर येत आहे.
महापालिका निवडणूक निकालानंतर आता मुंबईतील काँग्रेसचे बडे नेते भाई जगताप यांना कारणे दाखवा नोटीस बजावली गेली आहे. कारण, मुंबई महापालिका निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवानंतर भाई जगताप यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करत, थेट मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांचा राजीनामा मागितला होता. यावर आता पक्षश्रेष्ठींनी याची गंभीर दखल घेत त्यांना सात दिवसांत लेखी उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
याशिवाय, रविवारी मुंबईत काँग्रेसच्या नेत्यांचीही बैठक पार पडणार आहे. महापालिका निवडणुकीतील अपयशानंतर होणारी ही बैठक अतिशय महत्त्वाची असून, यामध्ये पराभवावर विचारमंथन केले जाण्याची शक्यता आहे. शिवाय, आगामी काळात जिल्हापरिषद, पंचायत समिती निवडणुकी होणार आहेत, त्यामुळे त्या दृष्टीने पक्षाची दिशा काय असेल याचीही चर्चा होवू शकते.
या महत्त्वपूर्ण बैठकीस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण काँग्रेस विधानसभेचे नेते विजय वडेट्टीवार आणि काँग्रेस विधान परिषदेचे नेते सतेज पाटील उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. ही बैठक रविवार, १८ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता दादर येथील टिळक भवन येथे होणार आहे.
काँग्रेस कार्यकारिणी सदस्य आणि माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, नसीम खान, गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे, माजी मंत्री अमित देशमुख, विश्वजीत कदम आणि राज्य निवडणूक समितीचे इतर सदस्य देखील या बैठकीस उपस्थित राहतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.