Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis addressing the media after BJP’s historic victory in municipal elections.

 

esakal

Election News

Devendra Fadnavis Reaction : महापालिका निवडणुकांमधील ऐतिहासिक यशानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....

Devendra Fadnavis reacts after historic municipal election victory : अनेकप्रकारे सगळे रेकॉर्ड आपण तोडलेले आहेत. २९ पैकी २५ महापालिकांमध्ये भाजप किंवा महायुतीची सत्ता ही येते आहे, असंही फडणवीसांनी म्हटलंय.

Mayur Ratnaparkhe

Devendra Fadnavis’ First Reaction After Municipal Election Victory : राज्यभरातील महापालिका निवडणुकीत भाजपने घवघवीत यश मिळवले असून, सर्वात जास्त जागा जिंकण्याची कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे भाजप आणि शिवसेना महायुतीने ठाकरेंना जबरदस्त धक्का देत, मुंबई महापालिकेतही विजय मिळवण्यात यश मिळवले आहे. या ऐतिहासिक विजयानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेचे आभार मानत, पहिली प्रतिक्रिया दिली.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘’आज मी सर्वप्रथम महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानतो. महापालिका निवडणुकीत भाजप महायुतीला महाविजय मिळालेला आहे. अनेकप्रकारे सगळे रेकॉर्ड आपण तोडलेले आहेत. २९ पैकी २५ महापालिकांमध्ये भाजप किंवा महायुतीची सत्ता ही येते आहे.’’

तसेच ‘’विशेष करून सगळ्यांचं लक्ष लागून असलेल्या, मुंबई महापालिकेतही जरी आथा मतमोजणीला उशीर होतोय. अजून मतमोजणी बाकी आहे तरी जे काही ट्रेंड्स आहेत. त्याप्रमाणे निश्चित बहुमत महायुतीला या ठिकाणी मिळणार आहे. त्याप्रमाणे मुंबईच्या महापालिकेवरही महायुतीचाच झेंडा फडकेल. याबाबत आमच्या मनात कोणतेही शंका नाही.’’ असंही फडणवीस म्हणाले आहेत.

याशिवाय ‘’आपण या निवडणुकीत विकासाचा अजेंडा घेवून गेलो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादाने त्यांनी जो विकासाचा अजेंडा दिला आहे, तोच अजेंडा घेवून आम्ही जनतेत गेलो होतो. या विकासाच्या अजेंड्याला जनतेने भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. याबाबत मनापासून आनंद होतोय.’’ असंही फडणवीसांनी म्हटलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MP Train Accident : एक्सप्रेसमध्ये आगीची अफवा पसरताच प्रवाशांच्या रुळावर उड्या, दुसऱ्या ट्रेनने अनेकांना चिरडले; ५ जणांचा जागीच मृत्यू

T20 WC, IND W vs PAK W, Playing XI: हरमनप्रीत कौरने टॉसही जिंकला, पण पाकिस्तानी कर्णधाराशी हस्तांदोलन केलं की नाही?

US Iran Deal: अमेरिका-इराण कराराचा मोठा मसुदा तयार! होर्मुज स्ट्रेट खुले होणार; तेलबंदी हटणार, डीलमध्ये काय ठरलं?

Latest Live Updates Marathi: बंडखोर टीएमसी नेत्यांनी घेतली केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट

Waste Management: उरुळी कांचनमध्ये अत्याधुनिक घनकचरा प्रकल्पाला गती; देवस्थानकडून दोन एकर जागा

SCROLL FOR NEXT