Election News

Fadnavis on Results : फडणवीसांनी सांगितलं भाजपच्या विजयाचं गुपित; अशी वाढली मतांची टक्केवारी...

संतोष कानडे

मुंबईः चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती येत आहेत. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजपला बहुमत मिळालं आहे. तर तेलंगणामध्ये बीआरएसची सत्ता जावून काँग्रेसची सत्ता येत आहे. भाजपच्या या विजयानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Telangana Election Results 2023

देवेंद्र फडणवीस बोलताना म्हणाले की, मोदींनी सामान्य माणसाच्या मनात जो विचार बिंबवला त्या विचारामुळे भाजपचा विजय झाला. या विजयाचं श्रेय मोदींचं आहे. त्यांच्या नावाचा हा करिष्मा असून अमित शाह आणि जे.पी. नड्डा यांच्यासह त्या-त्या राज्यातील भाजपची जी टीम आहे त्यांचं हे श्रेय आहे.

फडणवीस पुढे म्हणाले, भाजपची मतं १० टक्क्यांपेक्षा जास्त वाढलेली आहेत. विशेषतः छत्तीसगमध्ये १७ टक्के, मध्य प्रदेशात ८ टक्के आणि तेलंगणात १० टक्के मतं वाढली आहेत. सगळीकडेच मोठ्या प्रमाणावर जनतेचा विश्वास भाजपवर वाढत आहे.

''चारही राज्यांमध्ये मिळून ६३९ पैकी ३३९ जागा भाजप जिंकत आहे. हा अभूतपूर्व असा निकाल आहे. एक प्रकारे जनतेच्या मनात काय आहे, याची ही नांदी आहे. लोकसभेमध्येही मोठा विजय एनडीएला मिळणार आहे.''

राहुल गांधींना नाकारलं- फडणवीस

इंडिया आघाडी आणि राहुल गांधीजींच्या अजेंड्याला लोकांनी नाकारलं आहे. आता इंडिया आघाडीची बैठक होईल, विजयाचं खापर ईव्हीएमवर फोडलं जाईल. परंतु ते काहीही बोलले तरी जनता मोदीजींच्या पाठिशी आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: सणासुदीत पेट्रोल-डिझेल महागलं! जिओ-बीपीच्या दरवाढीनंतर सरकारी पंपांवर किती भाव? महाराष्ट्रातील नवे दर पाहा

Kochi Mini Cooper Accident : आईने वाढदिवसाला गिफ्ट केली ड्रीम कार, पोराने दारू पिऊन तिघांना चिरडले; म्हणाला- "पप्पा सगळं मॅनेज करतील"

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

SCROLL FOR NEXT