Election News

पाच राज्यांतील मुख्यमंत्र्यांची काय आहे स्थिती; वाचा कुठे कोण आघाडीवर?

सकाळ डिजिटल टीम

विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु असून आज पाच राज्यांचं भवितव्य ठरणार आहे. हे भवितव्य जितकं राज्यांचं आहे तितकंचं ते त्या त्या राज्यातील मुख्य नेत्यांचंही ठरणार आहे. निवडणुकीच्या मतमोजणीचे पहिले कल आले आहेत. या निवडणुकीत पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने जोरदार मुसंडी मारली असून सत्तेच्या दिशेने वाटचाल करत आहे. दुसरीकडे गोव्यामध्येही काँग्रेस आणि भाजपमध्ये काँटे की टक्कर सुरु आहे. या निवडणुकींच्या कलांमधील महत्त्वाची बाब म्हणजे सध्या तीन विद्यमान मुख्यमंत्री पिछाडीवर आहेत.

  • गोवा:

  • गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत साखळी मतदार संघातून विजयी झाले आहेत.

भाजपचे दोन्ही उपमुख्यमंत्री पिछाडीवर. काँग्रेस उमेदवारांची आघाडी

  • पंजाब:

  1. पंजाबमध्येही हीच परिस्थिती असून पंजाबचे विद्यमान मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी देखील पिछाडीवर आहेत.

  2. त्यांच्या आधीचे मुख्यमंत्री आणि पंजाब लोक काँग्रेस या नव्या पक्षाचे प्रमुख कॅप्टन अमरिंदर सिंग हे देखील पिछाडीवर आहेत.

  3. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू पिछाडीवर आहेत.

  4. आप पंजाबमध्ये सर्वांत आघाडीवर असूनही राज्याचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार भगवंतसिंग मान आघाडीवर आहेत.

  • उत्तर प्रदेश:

  1. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे गोरखपूर मतदारसंघातून 4 हजार 464 मतांनी आघाडीवर आहेत

  2. समाजवादी पक्षाचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव हे देखील आपल्या करहल मतदारसंघातून आघाडीवर आहेत

  • उत्तराखंड:

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी हे खतिमा मतदारसंघातून पराभूत झाले आहेत.

  • मणिपूर:

मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह हेनगांग मतदारसंघातून 2,598 मतांनी आघाडीवर आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Cabinet: गरिबांसाठी हक्काची घरे, शेतकऱ्यांनाही दिलासा; मंत्रिमंडळ बैठकीत १० मोठ्या निर्णयांची घोषणा

District Bank election:चुकीचे लोक नकोत, म्हणून स्वाभिमान बाजूला ;डॉ. सुजय विखे पाटील ; जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शेतकऱ्याचे हित महत्त्वाचे

Central Railway: प्रवाशांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेवर ७५ दिवसांचा विशेष ब्लॉक, मेल/एक्सप्रेसच्या वेळापत्रकात बदल

Marathi News Live Updates: पुण्यात राष्ट्रीय समाज पक्षातर्फे सोशल मीडिया प्रबोधन शिबीर

Retirement Planning: रिटायरमेंटनंतर आरामात जगण्यासाठी 1.5 कोटी पुरेसे नाही? HDFC पेन्शनच्या अहवालातून मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT