vinod tawade 
Election News

Exit Polls Fails : एक्झिट पोल्स फेल का ठरले? विनोद तावडेंनी स्पष्टच सांगितलं

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांपैकी चार राज्यांचे निकाल आज जाहीर होत आहेत यातील तीन राज्यांमध्ये भाजपने मुसंडी मारली आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांपैकी चार राज्यांचे निकाल आज जाहीर होत आहेत. या चार पैकी तीन राज्यांमध्ये भाजपने मुसंडी मारली आहे. पण दोन दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या एक्झिट पोल्समधून मात्र या तिनही ठिकाणी काँग्रेस सत्ता स्थापन करेल असे अंदाज वर्तवण्यात आले होते.

पण प्रत्यक्षात तसं होऊ शकलं नाही, त्यामुळं हे एक्झिट पोल्स फेल ठरले आहेत. पण हे पोल्स फेल का ठरले याच्या मागचं कारण भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी सांगितलं आहे. (Exit Polls 2023 Why did exit polls fail BJP Vinod Tawde said clearly)

एक्झिट पोल्स फेल ठरले!

माध्यमांशी बोलताना तावडे म्हणाले, "एक्झिट पोलचं एक तंत्र आहे पण त्याचं सॅम्पल इतकं लहान असतं की त्यावर शंभर टक्के बरोबर भाकीत कधीच होऊ शकतं नाही. पण दुर्देवानं ज्यांनी ज्यांनी भाजप आता हारणार, आली तर फक्त मध्य प्रदेश नाहीतर ते ही नाही. राजस्थानात भाजप येईल असंही काही एक्झिट पोल्सनं म्हटलं होतं पण हे सर्व एक्झिट पोल्स खोटे ठरले आहेत" (Latest Marathi News)

तेलंगणात भाजपच्या प्रचाराचा फायदा काँग्रेसला

पण आता नक्की सांगेन मतदान झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ज्यावेळी गृहमंत्री अमित शहा, अध्यक्ष जेपी नड्डा आम्ही जेव्हा चर्चा करत होतो तेव्हा आम्हाला स्पष्टपणे छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेशात आपणचं येऊ आणि तेलंगणात काँग्रेसचं सरकार येईल, असं म्हटलं होतं. कारण आपण जो केसीआर यांच्याविरोधात प्रचार केला त्याचा फायदा आपल्याला न होता काँग्रेसला होईल, हे विश्लेषण आमच्या अंतर्गत बैठकीत आलंच होतं. (Marathi Tajya Batmya)

काँग्रेस कुठे चुकली?

काँग्रेसनं मुद्द्याच्या आधारे प्रचार केला असता तर त्यांना फायदा झाला असता. राजस्थानात एका दलित महिलांवर अत्याचार झाला त्यावर केंद्रातील एकही नेता बोलला नाही. तसेच तिथं कन्हैय्यालालची हत्या झाली, तिथं मारेकरी मुस्लीम असला तरी तुम्ही त्यावर बोलला नाहीत. ही काँग्रेसची मानसिकताच त्यांना महागात पडली.

मध्य प्रदेशात प्रियंका गांधी म्हणाल्या की, ज्योतिरादित्य शिंदे यांची उंची किती? त्यांनी एखाद्याची उंची काढणं आणि राहुल गांधींनी पनौती म्हणणं हे भारतीय माणसांना पटत नाही. लोक या गोष्टींचं निरिक्षण करतात, त्यामुळं प्रचाराची एक पातळी असायला पाहिजे ती सोडल्यानं त्यांचं जास्त नुकसान झालं, असंही विनोद तावडे यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पूरग्रस्तांसाठी ५ रुपये मागितले तर..., शेतकऱ्यांकडून वसुलीच्या टीकेवर मुख्यमंत्री फडणवीस कडाडले; कारखान्यांना इशारा

Kolhapur Accident : संतोष आणि मोहम्मद जिवलग मित्र पण नियतीच्या मनात वेगळ होतं..., दुचाकींच्या धडकेत दोघे मित्र ठार

Bachchu Kadu : 'शेतकरी एकत्र येत नाही, हाच सर्वांत मोठा शोक'; बच्चू कडूंचा सरकारवर घणाघात

Latest Marathi News Live Update: छत्रपती संभाजीनगर ते जळगाव महामार्गावर अर्धा तास रस्ता रोको आंदोलन

Kolhapur Police : पोलिस अधिकाऱ्याच्या गळ्यातील ताईत डिपार्टमेंट बदनाम करतोय, मोका प्रस्ताव रद्द करण्यासाठी ६५ लाखांची केली मागणी अन्...

SCROLL FOR NEXT