Shrikant Pangarkar after winning the Jalna Municipal Corporation election as an independent candidate amid controversy linked to the Gauri Lankesh murder case.
esakal
Gauri Lankesh murder case Suspected accused Shrikant Pangarkar win Jalna Municipal Election : पत्रकार आणि मानवाधिकार कार्यकर्त्या गौरी लंकेश यांची २०१७ मध्ये हत्या झाली होती. या प्रकरणातील आरोपी श्रीकांत पांगारकर यांनी जालना महानगरपालिका निवडणूक लढवून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. श्रीकांत पांगारकर यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली आणि विशेष म्हणजे ते विजयी देखील झाले आहेत. ज्याची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा देखील सुरू आहे.
पांगारकर यांनी जालना महापालिका निवडणुकीत भाग घेत, प्रभाग क्रमांक १३ मधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. त्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे रावसाहेब ढोबळे यांना पराभूत केलं. प्राप्त माहितीनुसार पांगारकर यांना २ हजार ६६१ मते मिळाली तर ढोबळे यांना २ हजार ४७७ मते मिळाली. शिवसेना वगळता जवळजवळ सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी पांगारकर यांच्या विरोधात उमेदवार उभे केले होते.
५ सप्टेंबर २०१७ रोजी गौरी लंकेश यांची बंगळुरू येथील त्यांच्या निवासस्थानाबाहेर गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या हत्येमुळे देशभरात संतापाची लाट उसळली होती. यानंतर ऑगस्ट २०१८ मध्ये महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने पांगारकर यांना या प्रकरणात अटक केली होती.
तर, ४ सप्टेंबर २०२४ रोजी कर्नाटक उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला होता. खरंतर पांगारकर हे यापूर्वी २००१ ते २००६ या कालावधीत जालना नगरपरिषदेचे सदस्य होते. २०११ मध्ये शिवसेनेकडून तिकीट नाकारलं गेल्यानंतर ते हिंदू जनजागृती समितीत सामील झाले होते.
भाजपाने जालना महानगरपालिकेत बहुमत मिळवले आहे. ६५ सदस्यीय जालना महानगरपालिकेत भाजप ४० पेक्षा अधिक जागांवर विजयी झालेला आहे. तर, भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी स्वतंत्रपणे ही निवडणूक लढवली होती. तर ठाकरे गट, पवार गट आणि काँग्रेस यांचा समावेश असलेली महाविकास आघाडी एकत्रितपणे या निवडणुकीला सामोरी गेली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.