ammu & Kashmir political turmoil intensifies over 5 nominated MLAs as parties await election results. esakal
Election News

निकालापूर्वीच जम्मू-काश्मीरमध्ये गदारोळ! भाजपाला बहुमत मिळाले नाही तर प्लॅन B काय? 5 आमदार बदलवणार सत्ता समीकरण?

Political Uproar Over Nominated MLAs Ahead of Jammu & Kashmir Election Results: एक्झिट पोलनुसार कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे ५ नामनिर्देशित आमदार सत्ता समीकरणं बदलू शकतात.

Sandip Kapde

जम्मू-काश्मीर विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर होणार आहेत. मात्र, निकालापूर्वीच केंद्रशासित प्रदेशात पाच नामनिर्देशित आमदारांबद्दल जोरदार राजकीय गोंधळ सुरू झाला आहे. विरोधी पक्षांनी यावर आक्षेप नोंदवला असून, भाजपाच्या फायद्यासाठी हे सर्व घडवले जात असल्याचा आरोप केला आहे. पीडीपी आणि नॅशनल कॉन्फरन्स यांच्यासह इतर विरोधकांनी एलजी मनोज सिन्हा यांच्यावर भाजपाला अनावश्यक पाठिंबा देण्याचे आरोप केले आहेत. निवडणुकीच्या निकालाआधीच या मुद्द्यावर वाद चिघळला आहे.

नामनिर्देशित आमदारांचे महत्व

एक्झिट पोलनुसार कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे ५ नामनिर्देशित आमदार सत्ता समीकरणं बदलू शकतात. भाजपाला बहुमत मिळाले नाही तर हे आमदार त्यांच्यासाठी निर्णायक ठरू शकतात, अशी भीती विरोधकांमध्ये व्यक्त होत आहे.

२०१४ च्या निवडणुकीनंतर भाजपाने पीडीपीसोबत सरकार स्थापन केले होते, मात्र २०१८ मध्ये ते दोन्ही पक्ष एकमेकांपासून वेगळे झाले. २०१९ मध्ये जम्मू-काश्मीरचे राज्य पुनर्रचना करत अनुच्छेद ३७० रद्द करून ते केंद्रशासित प्रदेश बनवले. आता ६ वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर जम्मू-काश्मीरला सरकार मिळण्याची शक्यता आहे. मात्र, सरकार स्थापनेत या पाच नामनिर्देशित आमदारांची भूमिका कशी असेल, यावरुन मोठी चर्चा सुरू आहे.

भाजपाच्या रणनीतीवर संशय-

भाजपाच्या सूत्रांकडून पाच नामनिर्देशित आमदारांची नावे पुढे येत आहेत. त्यापैकी चार जण जम्मूतील असतील आणि एक काश्मीरचा असणार आहे. भाजपाच्या नेत्या डॉ. फरीदा खान यांना काश्मीरमधून आमदार म्हणून नियुक्त केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुनर्रचना कायद्यानुसार पाच आमदारांची नियुक्ती होऊ शकते, ज्यापैकी तीन महिला असणार आहेत. विरोधकांचे म्हणणे आहे की, या नेमणुकीच्या माध्यमातून भाजपाला सत्ता मिळवून देण्याचा प्रयत्न होत आहे.

विरोधकांचे आरोप आणि भविष्याचे समीकरण-

विरोधकांचा आरोप आहे की एलजी सिन्हा या नेमणूक प्रक्रियेचा गैरवापर करून भाजपाला सत्ता मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहेत. विशेषतः या आमदारांमध्ये दोन काश्मिरी पंडित, एक पीओकेमधून आलेला विस्थापित आणि तीन महिलांचा समावेश असणार आहे. यामुळे जम्मू-काश्मीर विधानसभेचा संख्याबळ ९५ होईल आणि सरकार स्थापनेसाठी ४८ चा जादुई आकडा गाठणे आवश्यक ठरेल. भाजपा विरोधकांना या पाच आमदारांच्या नियुक्तीमुळे निवडणुकीचा निकाल त्यांच्या विरोधात जाईल, अशी भीती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

IND vs ENG 2nd Test: W,W,W,W,W! मोहम्मद सिराज ऑन फायर, बेन स्टोक्स गांगरला; इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला

ती खूपच बारीक, काळी-सावळी... प्रियांका चोप्राला पहिल्यांदा पाहिल्यावर थक्क झालेली मराठी अभिनेत्री; म्हणाली- ती हिरोईन बनायला आलेली...

FASTag Annual Pass: FASTag वार्षिक पास घ्यायचा विचार करताय? मग घेण्यापूर्वी 'हे' 11 महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची सविस्तर उत्तरं जरूर वाचा!

Magnesium & Vitamin D Deficiency: व्हिटॅमिन-D ची पातळी कमी होण्यामागे असू शकतो 'या' खनिजांचा अभाव, 'हे' अन्नपदार्थ ठरतील उपयुक्त

SCROLL FOR NEXT