karnataka assembly election 2023 19 constituencies Congress aspirants rebelled BJP aspirants rebelled 14 constituencies politics
karnataka assembly election 2023 19 constituencies Congress aspirants rebelled BJP aspirants rebelled 14 constituencies politics sakal
Election News

Karnataka Election: आज होणार प्रचाराची सांगता; मतदान-मतमोजणी कधी ? जाणून घ्या सविस्तर

सकाळ वृत्तसेवा

Karnataka Election बेळगाव - विधानसभा निवडणुकीच्या जाहीर प्रचाराची सांगता सोमवारी (ता. ८) सायंकाळी सहा वाजता होणार आहे. १० मे रोजी मतदान आहे. त्यापूर्वी ४८ तास अगोदर नियमाप्रमाणे जाहीर प्रचार थांबविला जातो. त्यासाठी जाहीर प्रचाराच्या सभा रविवारी दिवसभर आणि सोमवारी दुपारपर्यंत चालतील.

कर्नाटक विधानसभेची घोषणा २९ मार्चला झाली. एका टप्प्यात निवडणूक घोषित झाली आहे. २२४ जागांसाठी घोषित निवडणुकीसाठी अधिसचूना १३ एप्रिलला जारी झाली. १३ ते २० एप्रिलदरम्यान उमेदवारी अर्ज स्वीकार प्रक्रिया पार पाडली.

यानंतर छाननी आणि उमेदवारी अर्ज माघार प्रक्रिया पार पडल्यानंतर अंतिम चित्र स्पष्ट झाले. त्यानंतर जाहीर प्रचाराला सुरुवात झाली व २३ एप्रिलपासून सुरू झालेल्या प्रचाराची सांगता उद्या (ता. ८) दुपारनंतर होणार आहे. यामुळे राज्यातील बेळगावसह राज्यामधील विविध भागात अंतिम टप्प्यातील प्रचाराला वेग आलेला आहे.

जिल्ह्यात १८ विधानसभा मतदारसंघ आहेत. १८५ उमेदवार आखाड्यात आहेत. त्यापैकी १८ जणांची निवड मतदारांना करायची आहे. यामुळे मतदार कोणाला कौल देतात, हे पाहावे लागणार आहे. त्यासाठी येत्या १० मे रोजी मतदान होईल आणि १३ मे रोजी मतमोजणी आहे. त्याची प्रशासकीय पातळीवर तयारी सुरू असली पक्ष व उमेदवारांच्या पातळीवर अंतिम टप्प्यात जोर लावण्यात येत आहे. शिवाय अखेरच्या काळात घरोघरी जाऊन भेट आणि गाठीभेटी घेण्याचे नियोजन उमेदवारांनी सुरू केले आहे.

यंदाची विधानसभा निवडणूक राजकीय पातळीवर व्यापक चर्चेची ठरणार आहे. जनतेचा कौल डबल इंजिनच्या सरकारला आहे, वा मानसिकता बदलली आहे, त्याचा संदेश या निवडणुकीमुळे मिळणार आहे.

भाजप आपली पूर्ण शक्ती पणाला लावत राज्य पिंजून प्रचाराने काढले; तर काँग्रेसनेही तितक्याच ताकदीने प्रत्युत्तर देऊन भाजपचे अनेक विषय जनतेपुढे मांडले. त्याला जोड भरीव गॅरंटी योजनांची मिळाली आहे. यामुळे यंदाची निवडणूक काँटे की टक्कर ठरली आहे. जिल्ह्यात महाराष्ट्र एकीकरण समिती व अपक्ष उमेदवारांनी राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारविरुद्ध कडवीझुंज दिली आहे. यामुळे यास्वरुपाच्या ५ मतदार संघातून कोण निवडून येते, त्याचे औत्सुक्य आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: बारावीच्या परीक्षेचा निकाल आज; असा पाहा ऑनलाइन पद्धतीने निकाल

Loksabha Election: महाराष्ट्र सर्वात मागे, लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाची आडेवारी समोर

आजचे राशिभविष्य - 21 मे 2024

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

SCROLL FOR NEXT