Kasba Chinchwad By-Election Result  esakal
Election News

कसब्यात कोण बाजी मारणार? चिंचवडमध्ये कुणाच्या अस्तित्वाला धक्का लागणार? उद्या कळणार Kasba Chinchwad By-Election Result

कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणूकीचा उद्या निकाल

रुपेश नामदास

Kasba Chinchwad By-Election Result: पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणूकीच्या प्रचाराच्या तोफा शुक्रवारी सायंकाळी थंडावल्या. भाजप आणि महाविकास आघाडीने केलेल्या प्रतिष्ठेच्या या पोटनिवडणूकीत दोन्ही पक्षांकडून दिग्गज नेत्यांच्या फौजा प्रचारासाठी पुण्यात तळ ठोकून होत्या.

दोन्हीही बाजूने स्टार प्रचारकांची कोणतीच कमी नव्हती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापासून ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार देखील या निवडणूकीत उतरले होते.

दरम्यान या दोन्ही जागांसाठी रविवारी मतदान पार पडलं आहे. कसबा पोटनिवडणूकीत एकूण ५०.६ टक्के मतदान पार पडलं. तर चिंचवडमध्ये ५०.४७ पार पडलं आहे. कसब्यात प्रतिष्ठेच्या लढतील कोण बाजी मारणार हे उद्या समजणार आहे.

तर चिंचवड पोटनिवडणूकीत तिरंगी लढत आहे. त्यामुळे या ठिकाणी देखील चुरशीची लढत पाहिला मिळणार. दरम्यान गुरूवारी सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे.

कसबा पेठेसाठी मतमोजणी कोरेगाव पार्क येथील धान्य गोदामात होणार आहे. तर चिंचवडसाठी मतमोजणी थेरगाव येथील शंकरअण्णा गावडे कामगार भवनात होणार आहे. निकालाची पहिली फेरी सकाळी ८.३० वाजेपर्यंत समोर येईल.

कसब्याच्या मतमोजणीकरिता १४ टेबल करण्यात आले असून मतमोजणीच्या २० फेऱ्या होणार आहेत. तर चिंचवडमध्ये मतमोजणीकरिता १५ टेबल तर ३७ फेऱ्या होणार आहेत. राज्याचे विधिमंडळाचे अधिवेशन सुरु असल्यामुळे निकाल येताच पडसाद अधिवेशनात उमटण्याची शक्यता आहे.

कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूकीचा निकाल सर्वात आधी पाहण्यासाठी सकाळच्या पेजला भेट द्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT