Election News

MP Election Result: मध्य प्रदेशात 20 वर्षांची अँटिइन्कम्बन्सी कमी करण्यासाठी भाजपनं वापरली 'ही' स्ट्रॅटजी

निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच मध्य प्रदेशात भाजपला अँटिइन्कम्बन्सीचा फटका बसेल असं सांगितलं जात होतं.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच मध्य प्रदेशात भाजपला अँटिइन्कम्बन्सीचा फटका बसेल असं सांगितलं जात होतं. त्याचबरोबर गेल्या निवडणुकीप्रमाणं यंदाही काँग्रेसचं मध्य प्रदेशात सरकार स्थापन करेल अशा चर्चा होत्या.

पण याच फॅक्टरवर भाजपनं गांभीर्यानं काम केलं, या अँटिइन्कम्बन्सीचा फील कमी करण्याासाठी भाजपनं खास रणनिती राबवली अन् त्याचा परिणाम आज दिसूनही आला. याचं विश्लेषण भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी केलं आहे. (Madhya Pradesh Election 2023 Result BJP strategy to reduce anti incumbency feeling)

काय होती भाजपची स्ट्रॅटेजी

तावडे म्हणाले, "भाजपची निवडणूक संचालनाची आगळीवेगळी व्यवस्था असते. त्यानुसार मध्य प्रदेशात आपण जर महिला मतदारांची संख्या वाढवली तर आपल्याला इथं जो अँटिइन्कम्बन्सीचा फील येतो तो कमी होईल. १८ वर्षे शिवराज सिंह चौहान मुख्यमंत्री आहेत त्यामुळं पुन्हा तोच चेहरा का? असं वाटणारा एक वर्ग असू शकतो. (Latest Marathi News)

एक त्यांना चाहणारा तर अजून किती वर्षे असं वाटणाराही एक वर्ग आहे. त्यामुळं भाजपनं मध्य प्रदेशात आणखी पाच सिनिअर चेहरे दिले. त्यामुळं या लोकांना असं वाटलं की बहुधा मुख्यमंत्रीपदासाठी आणखी चेहरे येऊ शकतात. यांसारख्या बारीक गोष्टी पक्षाच्या नेतृत्वानं हाताळल्या. त्याचाच निकाल मध्य प्रदेशात दिसतो आहे. (Marathi Tajya Batmya)

छत्तीसगडमध्ये दोन मुद्दे महत्वाचे

छत्तीसगमध्ये सुद्धा महादेव अॅपचा विषयातला भ्रष्टाचाराचा मुद्दा आणि आदिवासींमधील भाताच्या किंमतीचा विषय होता हे दोन्ही मुद्दे योग्य प्रकारे हँडल झाले. त्यामुळं एका बाजुला भ्रष्टाचाराविरोधातील मुद्दे असतील तर दुसऱ्या बाजुला रोजच्या रोज गरजेचे मुद्दे असतील याचं कॉम्बिनेशन भाजपच्या नेतृत्वानं खूप चांगलं केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi NIA Custody : अनमोल बिश्नोईला ११ दिवसांच्या NIA कोठडी!, पटियाला हाऊस कोर्टाचा निर्णय

Pakistan Involvement in Red Fort Blast : अखेर पाकिस्तानचा खोटेपणाचा बुरखा फाटलाच! दिल्ली स्फोटातील सहभागाची नेत्यानेच दिली कबूली

Petrol Pump : पेट्रोल पंप संध्याकाळी सातनंतर बंद करण्याचा निर्णय मागे; पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनचा निर्णय

Mundhwa Land Case : मुंढवा जमीन प्रकरणात शीतल तेजवानींचा जबाब नोंदविला

Pravin Darekar : सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाला गती; सहकाराला आधुनिकतेची जोड द्यावी

SCROLL FOR NEXT