Aam Aadmi Party Maharashtra Declared Candidates Vidhan Sabha Election Esakal
Maharashtra Election 2024 Result

Aam Aadmi Party Maharashtra: इंडिया आघाडीत बिघाडी? 'आम आदमी'ने जाहीर केला महाराष्ट्रात तिसरा उमेदवार

Aam Aadmi Party Maharashtra Vidhan Sabha Election: एकीकडे आम आदमी पक्ष इंडिया आघाडीचा घटक पक्ष आहे. तर ते दुसरीकडे एक एक उमेदवार जाहीर करत आहेत. त्यामुळे इंडिया आघाडीतच बिघाडी झाल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत.

आशुतोष मसगौंडे

Aam Aadmi Party Maharashtra Declared Candidates Vidhan Sabha Election:

येत्या काही दिवसांतच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. अशात राज्यातील सर्वच प्रमुख पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी, दोन्ही शिवसेना, काँग्रेस, भाजप आणि मनसेनेही निवडणुकीच्या दृष्टीने पाऊले टाकायला सुरुवात केली आहे.

यामध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्षही मागे नाही. त्यांनीही महाराष्ट्र विधानसभा निवडणुका गांभिर्याने घेतल्या असून आता राज्यात परभणीतून सतीश चकोर यांच्या रुपाने तिसरा उमेदवार जाहीर केला आहे.

दरम्यान राज्यातील सर्व 288 जागा लढवण्याची तयारी आम आदमी पक्षाने केली असून, आतापर्यंत त्यांनी बीड आणि लातूरमध्येही उमेदवार जाहीर केले आहेत.

एकीकडे आम आदमी पक्ष इंडिया आघाडीचा घटक पक्ष आहे. तर ते दुसरीकडे एक एक उमेदवार जाहीर करत आहेत. त्यामुळे इंडिया आघाडीतच बिघाडी झाल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही आम आदमी पक्ष इंडिया आघाडीचा भाग होता. त्यांनी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून एकही जागा न लढवता महाविकास आघाडीला पाठिंबा दिला होता. याचबरोबर मुख्यमंत्री केजरीवाल यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा मुंबईत येऊन प्रचारही केला होता.

सध्या निवडणुकीच्या प्रतिक्षेत असलेले सर्वच पक्ष सध्या राज्यात प्रचारात आघाडी घेताना दिसत आहेत. यामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा सुरू आहे तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा सुरू आहे.

तिकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मराठावाडा दौऱ्यानंतर आता विदर्भ दौऱ्याच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीची तयारी करत आहेत. त्यामुळे यंदाची विधानसभा निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नोरासारखी दिसायला पाहिजे, पत्नीला दररोज ३ तास...; पतीकडून छळ, महिलेची पोलिसात तक्रार

Maharashtra Latest News Update: महत्वाच्या विषयांवर फडणवीसांची भेट घेतली- राज ठाकरे

Reels addiction Impact on Brain: रील्सचा मोह करतोय मेंदूवर दारूसारखा परिणाम? जाणून घ्या धोके आणि तज्ज्ञांनी सांगितलेले उपाय

माेठी बातमी! 'इंडिया आघाडीचे खासदार आक्रमक; दूध दर वाढीसाठी संसद भवनासमोर आंदोलन', भेसळ करणाऱ्यांवर कारवाई करा

Pune Rain Update : ताम्हिणी घाटात ५७५ मिमी पावसाची नोंद; पुण्यात रेड अलर्ट

SCROLL FOR NEXT