Deglur Vidhan Sabha elections 2024 sakal
Maharashtra Election 2025 Result

Assembly Elections 2024: इच्छुक कोणत्या पक्षाचा झेंडा घेणार हाती ?

Deglur Vidhan Sabha elections 2024 : देगलूर-बिलोली मतदारसंघात आमदार, अधिकाऱ्यांची फिल्डिंग

उमाकांत पंचगल्ले, सकाळ वृत्तसेवा

देगलूर: बिलोली राखीव मतदारसंघात उमेदवारी मिळविण्यासाठी आजी-माजी आमदार, सेवानिवृत्त सनदी अधिकारी यांच्यासह अनेक इच्छुक उमेदवारांची जोरदार तयारी सुरू आहे. मात्र, कोणाला कोणत्या पक्षाची उमेदवारी मिळणार, हे सांगणे कठीण झाले आहे.

अनेक बडे नेते, आजी-माजी आमदार, खासदार अचानकपणे पक्ष बदलत आहेत. यामुळे चळवळीचे कार्यकर्ते मात्र गोत्यात सापडले आहेत. ज्यांच्याविरोधात आपण प्रचार करतो, उणे-दुणे काढतो त्यांचीच आज वाहवा करण्याची नामुष्की कार्यकर्त्यांवर येऊन ठेपणार की काय, अशी विचित्र परिस्थिती मतदारसंघात निर्माण झाली आहे. नुकतेच माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

यामुळे दादांना मानणाऱ्या वर्गात चलबिचल सुरू झाली आहे. यातच आमदार जितेश अंतापूरकर यांनी खासदार अशोक चव्हाण यांचे बोट धरत भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे माजी आमदार तथा उत्कृष्ट संसदपटू सुभाष साबणे यांना मोठा धक्का बसला आहे. देगलूर-बिलोली मतदारसंघ राखीव आहे.

म्हणून शेवटची टर्म असल्याने सुभाष साबणे यांनी कोणत्याही पक्षाचा झेंडा हाती घेण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे कोण कोणत्या पक्षाचा झेंडा हाती घेणार, कार्यकर्ते मतदार राजासमोर कसे सामोरे जाणार, असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

मतदारसंघात कार्यकर्त्यांची बॅनरबाजी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खासगी सचिव म्हणून काम पाहिलेले बालाजी पाटील खतगावकर, माजी सनदी अधिकारी, अनेक वर्षे मंत्रालयात कामकाज पाहिलेले मधू गिरगावकर यांनीसुद्धा बॅनरबाजी करत देगलूर-बिलोली मतदारसंघात निवडणुकीची तयारी दर्शविली आहे. या व्यतिरिक्त जया बाळू राजकुंडल, भीमशक्ती संघटनेचे शत्रुघ्न वाघमारे, माजी जिल्हा परिषद सदस्य निवृती कांबळे, प्रा. उत्तमकुमार कांबळे यांनाच उमेदवारी मिळणार असल्याची भूमिका सच्चे कार्यकर्ते ठामपणे मांडत आहेत. तसेच, बॅनरबाजी करत आहेत.

मुंबईच्या वाऱ्या वाढल्या

निवडणुकीची चाहूल लागताच दीपकभाऊ रामपूरकर, माजी अधिकारी वरवंटकर यांच्यासह अनेक इच्छुक पक्षाची उमेदवारी मिळविण्यासाठी मुंबईच्या वाऱ्या करत आहेत. बड्या नेत्यांची मनधरणी करत आहेत. यामुळे कोणाला कोणत्या पक्षाची उमेदवारी मिळणार, हे शेवटच्या क्षणापर्यंत सांगणे कठीण झाल्याचे चित्र देगलूर-बिलोली मतदारसंघात निर्माण झाले आहे.

#ElectionWithSakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Property Tax: पुणे महानगरपालिकेत भाजपने करमाफीचा शब्द फिरवला; ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना टॅक्स माफी नाही

Gas Cylinder Shortage : छत्रपती संभाजीनगर तालुक्यात ग्रामीण भागात गॅस टंचाई; लग्नसमारंभ व हॉटेल व्यवसाय अडचणीत, अनेक हाँटेल गॅसअभावी बंद

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदींनी ९.३ कोटींहून अधिक शेतकऱ्यांसाठी 'पीएम-किसान' योजनेचा २२ वा हप्ता जारी केला

Theur Fraud News : लँड डेव्हलपरला मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून १२ कोटींचा घातला गंडा

Pachod News : केकत जळगाव येथे कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT