Guhagar Assembly Elections 2024 sakal
Maharashtra Election 2025 Result

Guhagar Assembly Elections 2024: उदय सामंत- गुहागरच्या जागेचा निर्णय प्रलंबित; महायुतीच्या ८० टक्के जागा निश्चित

Guhagar Vidhan Sabha Elections 2024: गुहागर विधानसभेवर शिवसेनेने दावा केला आहे, त्यामुळे या जागेचा निर्णय प्रलंबित असल्याचेही त्यांनी सांगितले.

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी: महायुतीमध्ये राज्यातील ८० ते ८५ टक्के जागा वाटपाचा निश्चित झाला आहे. उर्वरित जागांबाबत भौगोलिक स्थितीचा विचार करुन महायुतीचे नेते मंडळी निर्णय घेऊन लवकरच उमेदवारांची घोषणा होईल, असे शिवसेना नेते व राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

गुहागर विधानसभेवर शिवसेनेने दावा केला आहे, त्यामुळे या जागेचा निर्णय प्रलंबित असल्याचेही त्यांनी सांगितले.

शासकी विश्रामगृहात पत्रकार परिषदेत ते म्हणाले, महायुतीमध्ये समन्वय असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली जात आहे. महाविकास आघाडीमध्ये सध्या मुख्यमंत्री पदावरुन रस्सीखेच सुरू आहे.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांबाबत फॉर्म्युला सांगून, बाशिंग बांधून असलेल्यांना गप्प बसवले असल्याची टीकाही त्यांनी केली. आगामी विधानसभा निवडणुकीत तीन पक्षांच्या नेत्यांनी समन्वय राखत जागा वाटपाबाबत निर्णय घेत आहेत.

८० ते ८५ टक्के जागा वाटपाचा निर्णय झाला आहे. काही इच्छूक मंडळी तिकीट मिळणार नसल्याने पलिकडे जात आहेत. कोणी गेल्यावर महायुतीला काही फरक पडणार नाही. ज्या जागांबाबत निर्णय झालेला नाही, त्यासाठी तेथील परिस्थितीचा विचार तीनही पक्षांचे नेतेमंडळी करतील आणि त्यावर तोडगा काढतील.

माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेनेतून लढावे की भाजपमधून याबाबतचा निर्णय भाजपचे नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील. रत्नागिरीवर भाजपाचे पदाधिकारी दावा करीत असल्याबाबत ते म्हणाले की, प्रत्येकाला तिकीट मागण्याचा अधिकार आहे. मात्र याबाबतचा निर्णय जिल्हा पातळीवर नाही तर राज्यातील नेतेमंडळी घेतील, माझ्या बाबत जो निर्णय वरिष्ठ घेतील तो मला मान्य असेल असेही सामंतांनी त्यांनी स्पष्ट केले.

#ElectionWithSakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ, 1st Test: रचिन रवींद्रचा भारी कॅच केएल राहुलने घेतला, तर कॉनवेचा अडथळाही दूर झाला! भारत विजयाच्या उंबरठ्यावर, पण...

IND A vs PAK A: तिलक वर्माचं शतक, अभिषेक शर्माची वादळी खेळी व्यर्थ! हाय व्होल्टेज सामन्यात पाकिस्तानचा भारतावर ४८ धावांनी विजय

ESIC New Rules 2026 : कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! आजारपण आणि प्रसूती लाभांसाठी अर्जाची गरज नाही; पैसे थेट बँक खात्यात जमा होणार

Gadchiroli History: गडचिरोलीच्या घनदाट जंगलात इतिहासाचा खजिना! १६व्या-१७व्या शतकातील ५० वीरगळांचा शोध, शूरवीरांच्या पराक्रमाची शिल्पे उजेडात

IND A vs PAK A: भारत पाकिस्तान सामन्यात टॉसवेळी नेमकं काय घडलं? होत, मॅच रेफ्रींच्या चुकीमुळे वाद, पाकिस्तानी चाहत्यांनी केले आरोप

SCROLL FOR NEXT