Understanding the principles of a moral code of conduct. Esakal
Maharashtra Election 2024 Result

What Is Moral Code Of Conduct: आचारसंहिता म्हणजे काय रे भाऊ? पाच मुद्द्यांत जाणून घ्या प्रकरण

Maharashtra Vidhansabha Election 2024: यंदा भाजप आणि काँग्रेस या दोन्ही प्रमुख पक्षांमध्ये मोठी लढत होणार आहे. तर, प्रादेशिक पक्षांनीही निवडणुकीसाठी आपली कंबर कसली आहे.

आशुतोष मसगौंडे

Moral code of conduct Maharashtra Assembly Election 2024:

केंद्रीय निवडणूक आयोग आज महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी तारखा जाहीर करणार आहे. यासाठी आयोगाने आज दुपारी 3:30 वाजता पत्रकार परिषद आयोजित केली आहे. या पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक आयोग निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम आणि तारखा जाहीर करणार आहे. यानंतर राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू होईल.

दरम्यान, राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुकीसाठी जोरदार तयारी चालू केली आहे. यामध्ये भाजप आणि काँग्रेस या दोन्ही प्रमुख पक्षांमध्ये मोठी लढत होणार आहे. तर, पक्ष फुटल्यानंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षांनीही निवडणुकीसाठी आपली कंबर कसली आहे.

आचारसंहिता म्हणजे काय?

मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका घेण्यासाठी निवडणूक आयोगाने काही नियम केले आहेत. या नियमांना आचारसंहिता म्हणतात.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या वेळी सर्व पक्ष, नेते आणि सरकारने या नियमांचे पालन करणे बंधनकारक असते.

आचारसंहिता केव्हा लागू होते?

एखाद्या निवडणुकीसाठी जेव्हा तारखा जाहीर होतात तेव्हापासूनच आचारसंहिता लागू होते. ही आचारसंहिता संपूर्ण निवडणूक प्रक्रिया संपून निवडणुकीचा निकाल लागत नाही तोपर्यंत लागू असते.

आचारसंहितेचा प्रथम वापर केव्हा झाला?

सध्या देशात निवडणुकीच्या काळात आचारसंहिताला अनन्यसाधारण महत्त्व असले तरी, देशात आचारसंहितेचा वापर पहिल्यांदा 1960 मध्ये केरळ विधानसभेच्या निवडणुकीवेळी झाला होता.

लोकसभा निवडणुकीसाठी 1960 मध्ये याचा पहिल्यांदा वापर झाला होता.

आचारसंहिता न पाळल्यास काय होते?

आचारसंहितेची अंमलबजावणी निवडणूक आयोगाकडून करण्यात येते. निवडणुकीच्या कालावधीत एकाद्या पक्षाने, उमेदवाराने किंवा त्यांच्या कार्यकर्त्याने आचारसंहितेचा भंग केल्यास निडणूक आयोगाकडे त्यांच्यावर कारवाई करण्याचा अधिकार असतो.

कधी कुठे लागू होते अचारसंहिता?

लोकसभा निवडणुकीसाठी संपूर्ण देशभरात आचारसंहिता लागू होते. विधानसभा निवडणुकांवेळी संबंधित राज्यामध्ये, तर पोटनिवडणुकीमध्ये संबंधीत मतदार संघात आचारसंहिता लागू होत असते.

#ElectionWithSakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नगराध्यक्षांची निवड जनतेतूनच! दिवाळीतच वाजणार निवडणुकांचा बिगुल; पहिल्या टप्प्यात नगरपालिका किंवा झेडपी, पंचायत समित्यांची निवडणूक

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात बनवा हेल्दी एग रोल, पाहा रेसिपीचा Video

आजचे राशिभविष्य - 03 ऑक्टोबर 2025

अग्रलेख : अस्वस्थ स्वातंत्र्ययोद्धा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 03 ऑक्टोबर 2025

SCROLL FOR NEXT