Ramtek Vidhan Sabha Elections 2024 sakal
Maharashtra Election 2024 Result

Ramtek Assembly Elections 2024: शिवसेनेच्या अस्तित्वाची; भाजप, कॉंग्रेसची लढाई प्रतिष्ठेची

Ramtek Vidhan Sabha Elections 2024: रामटेक विधानसभा मतदारसंघावरून रस्सीखेच; शिंदे शिवसेनाही आग्रही

चंद्रशेखर महाजन

नागपूर: नागपूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघातील रामटेककडे सर्व राजकारण्यांचे लक्ष लागले आहे. शिंदे शिवसेना, उद्धव सेनेच्या वाट्याला असलेल्या मतदारसंघावर आता भाजप आणि कॉंग्रेस पक्षाने दावा केला आहे.

महायुती, आघाडीमध्ये या मतदारसंघावरून बिघाडी होण्याची दाट शक्यता आहे.

रामटेकच्या गडावर भगवा फडविण्यासाठी सध्या भाजप आणि कॉंग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू आहे. महत्त्वाचे म्हणजे गेल्या काही वर्षांपासून शिवसेनेचा आमदार निवडून येत आहे. २०१४ मध्ये भाजप आणि २०१९ मध्ये शिवसेना समर्थित आशिष जयस्वाल अपक्ष निवडून आले. २०१४ मध्ये मल्लिकार्जुन रेड्डी हे भाजपच्या उमेदवार होते.

त्यांनी शिवसेनेच्या आशिष जयस्वाल यांचा पराभव केला होता. तर २०१९ मध्ये भाजपने पुन्हा रेड्डी यांना उमेदवारी दिली. मात्र, त्यांचा पराभव अपक्ष उमेदवार आशिष जयस्वाल यांनी केला. तर कॉंग्रेसच्या कोट्यात ही जागा आहे. यामुळे कॉंग्रेसच्या कोट्यात ही जागा यायला पाहिजे, असे मत सध्या कॉग्रेसचे राजकीय चाणक्य सुनील केदार यांचे आहे.

लोकसभा निवडणुकीचा ज्वर सध्या उतरला नाही. कॉंग्रेसने नवखा उमेदवार देऊन त्याला जिंकून आणले. तसेच शिवसेनेच्या कोट्यात हा मतदारसंघ कॉंग्रेसकडे घेऊन यश मिळविले. निवडणुकीत यश बघून सध्या कॉग्रेसने या मतदारसंघावर दावा केला. गेल्या पाच वर्षांपासून कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी सभा, मेळावे यातून संपर्क ठेवला आहे. उमेदवारी मिळेल या आशेवर ते आहेत. सध्या महाविकास आघाडीत ही जागा शिवसेनेकडे आहे. उद्धव ठाकरे यांनी यावर दावा केला आहे. रामटेक लोकसभा दिली.

आता रामटेक विधानसभा देणार नाही हे त्यांनी कळमेश्वर येथील जाहीर कार्यक्रमात बजावले. त्यांच्या जाहीर वक्तव्याने कॉंग्रेसमध्ये धडकी भरली आहे. राजेंद्र मुळक हे नैराश्यात गेले आहेत. त्यांच्यावर मतदारसंघ शोधण्याची वेळ आली आहे. मात्र, दावे प्रतिदाव्याच्या राजकारणात त्यांचा दुसरीकडे थारा लागेल, याची काही शक्यता नाही. कामठी मतदारसंघावर त्यांचा डोळा असला तरी मागील निवडणुकीत ऐन वेळेस त्यांनी उमेदवारी नाकारल्याने पदाधिकारी आणि मतदारही नाराज आहेत. रामटेक मतदारसंघावरून सध्या आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता आहे.

भाजप, शिंदे सेनेतही कुरघोडीचे राजकारण

२०१४ मध्ये भाजपने शिवसेनेचा उमेदवार आशिष जयस्वाल यांचा पराभव केला. मल्लिकार्जुन रेड्डी आमदार होते. तसेच २०१९ मध्ये सुद्धा ते भाजपचे उमेदवार होते. मात्र,शिवसेना समर्थित आशिष जयस्वाल यांनी त्यांचा पराभव केला. निवडून आल्यानंतर त्यांनी एकसंघ शिवसेनेला पाठिंबा दिला होता. नंतर ते शिंदे शिवसेनेत गेले. सध्या विजयी जागा कायम ठेवण्याचे धोरण महायुती आणि महाविकास आघाडीत असल्याने यावर शिवसेनेचा दावा आहे. यामुळे भाजपमध्ये असंतोष आहे. शिंदेसेना फारशी ताकद नसताना उमेदवार देऊन त्याचा पराभव होते, हे दिसून आल्याने भाजपने सावध पवित्रा घेतला आहे.

रामटेक द्या, उमरेड घ्या

भाजप आणि कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांनी उमरेड मतदारसंघावर लक्ष ठेवले आहे. भाजप, नंतर कॉंग्रेसचा आमदार झाला. यामुळे रामटेक कॉंग्रेसकडे देऊन उमरेड उद्धव ठाकरे यांना देण्याचा विचार सुरू आहे. तीच स्थिती भाजपमध्ये आहे. उमरेड शिंदेसेनेला देऊन माजी आमदार राजू पारवे यांना उमेदवारी देण्याची चर्चा आहे. मात्र, पारवे यांनी उमेदवारी दिल्यास पुन्हा भाजप, कॉग्रेस कार्यकर्ते नाराज होण्याची शक्यता आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर), बहुजन समाज पक्षाचा उमेदवारही येथे राहणार आहे.

#ElectionWithSakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

IND vs ENG 2nd Test: २४ वर्षांच्या पोराचे शतक! जेमी स्मिथ-हॅरी ब्रूक्सच्या खेळीने इंग्लंडचा पलटवार; गौतम गंभीरचा फसला प्लॅन

Ulhasnagar Crime : दारू पार्टीतील किरकोळ वादातून मित्राकडून मित्राचा खून; आरोपी शकील शेखला बेड्या

Dombivali News : आमदार राजेश मोरे यांनी पलावा पुलाचे उद्घाटन केले आणि पूल बंद झाला

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

SCROLL FOR NEXT