NCP chief Sharad Pawar meets party leaders to finalize candidate list for Vidhan Sabha Election 2024. Esakal
Maharashtra Election 2024 Result

Sharad Pawar: तुतारीची उमेदवारी मिळवण्यासाठी काय आहे पात्रता? शरद पवारांच्या जवळच्या नेत्यानं सांगितलं गणित

Sharad Pawar candidate selection: याचबरोबर निवडणूक लढवण्यासाठी तयारी करत असलेले उमेदवारही कोणत्या पक्षाकडून तिकीट मिळू शकते याबाबत चाचपणी करत आहेत.

आशुतोष मसगौंडे

NCP Sharadchandra Pawar party's selection of candidates:

लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने मिळवलेल्या यशानंतर अनेकांनी तुतारीची उमेदवारी मिळवी म्हणून प्रयत्न सुरू केले आहेत. अशात शरद पवार यांच्या जवळचे असलेले माजी मंत्री राजेश टोपे यांनी पक्ष कोणाला उमेदवारी देणार याबाबतचे गणित मांडत माहिती दिली आहे.

दरम्यान राज्यात कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. अशात राज्यातील सर्वच पक्ष आणि आघाड्या तयारीला लागले आहेत. याचबरोबर निवडणूक लढवण्यासाठी तयारी करत असलेले उमेदवारही कोणत्या पक्षाकडून तिकीट मिळू शकते याबाबत चाचपणी करत आहेत.

राष्ट्रावादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते राजेश टोपे यांनी उमेदवारी कोणाला देणार याबाबत बोलताना सांगितले की, "आम्हाला सत्ताधारी पक्ष म्हणून सरकार बनवायचे आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्ष निवडणून येण्याची क्षमता असणाऱ्या उमेदवारांनाच तिकिट देण्याबाबत सावध आहे. त्यामुळे ज्याची निवडून येण्याची क्षमता आहे, त्यालाच उमेदवारी मिळणार आहे."

गेल्या वर्षी अजित पवार आणि 40 आमदारांनी शरद पवार यांची साथ सोडली तेव्हा पवारांबरोबर राहिलेल्या मोठ्या नेत्यांमध्ये राजेश टोपे यांचाही समावेश होता. त्यामुळे आता पक्षात टोपे यांचे स्थान मोठे झाले आहे.

दरम्यान लोकसभेत शरद पवार यांच्या पक्षाने फक्त 10 जागा लढवूनही 8 जागी विजय मिळवला आहे. त्यामुळे असंख्य ईच्छुकांचा ओढा तुतारीकडे आहे. इतकेच नव्हे तर सत्ताधारी पक्षातील नेते आणि आमदारही शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्यासाठी रांगा लावत आहेत.

गेल्या काही दिवसांपूर्वी कोल्हापूरातील कागलचे भाजप नेते समरजीत घाटगे यांनी तुतारी फुंगली होती. तर लातूरमधील भाजपच्या एका माजी आमदारानेही शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

Who Is Jamie Smith? टीम इंडियाची झोप उडवणारा जेमी स्मिथ कोण? ज्याने केलीय १५० धावांची ऐतिहासिक खेळी, मोडले अनेक विक्रम...

२५ वर्षांनी झी मराठीवर दिसणार लोकप्रिय अभिनेत्री, कधीकाळी ठरलेली गाजलेली नायिका; नव्या मालिकेतून करणार कमबॅक

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT