इस्लामपूर: राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेली येथील काँग्रेस कमिटीची इमारत जयंत पाटील यांनी काँग्रेसला परत करावी. तरच, इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा त्यांना पाठिंबा असेल. अन्यथा निवडणुकीत कॉंग्रेस मदत करणार नाही, अशा तीव्र भावना वाळवा तालुका काँग्रेसच्या वतीने आज पक्षनिरीक्षकांना कळवण्यात आल्या.
दरम्यान, पक्षनिरीक्षक डॉ. साके शैलजानाथ यांनी भावना पक्षीय पातळीवर कळवून काँग्रेस कमिटीबाबत जयंत पाटील यांना लेखी कळवले जाईल, असे आश्वासन दिले.
शासकीय विश्रामगृहावर विधानसभा निवडणुकीबाबत कॉंग्रेस कार्यकर्त्यांची आंध्र प्रदेशचे माजी मंत्री, आमदार डॉ. साके शैलजानाथ व शशांक बावचकर यांच्या उपस्थितीत बैठक झाली. काँग्रेसचे वाळवा तालुकाध्यक्ष जितेंद्र पाटील, प्रदेश सरचिटणीस नंदकुमार कुंभार, महिला काँग्रेस प्रदेश सरचिटणीस ॲड. मनीषा रोटे, शहराध्यक्ष राजेंद्र शिंदे-सरकार, शिराळा तालुका निरीक्षक जयदीप पाटील, युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस विजय पवार, प्रदेश सदस्य ॲड. आर. आर. पाटील प्रमुख उपस्थित होते.
निरीक्षकांनी इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला येणाऱ्या अडचणी विचारल्या. सर्वांची मते जाणून घेतली. उपस्थित कार्यकर्त्यांनी इस्लामपूर शहरातील कॉंग्रेस कमिटीचे कार्यालय राष्ट्रवादीने बळकावले आहे. कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पत्रव्यवहार करून संबंधित घटना पक्षाला कळवली आहे. राष्ट्रवादीकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही. कॉंग्रेस कार्यालय जयंत पाटील यांनी कॉंग्रेसला न दिल्यास येत्या विधानसभा निवडणुकीत मदत करणार नाही, अशा प्रतिक्रिया कार्यकर्त्यांकडून उमटल्या.
#ElectionWithSakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.