Imtiaz Jaleel Vidhan Sabha Election Esakal
Maharashtra Election 2024 Result

AIMIM Maharashtra: विधानसभेसाठी 'एमआयएम'ला सापडेना मित्र पक्ष; महाविकास अन् तिसरी आघाडीही सोबत घेईना

Imtiaz Jaleel MIM: राज्यात राजू शेट्टी, बच्चू कडू आणि संभाजीराजे छत्रपती यांनी परिवर्तन महाशक्ती नावाने तिसरी आघाडी स्थापन केली आहे.

आशुतोष मसगौंडे

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी विधानसभेसाठी पाच उमेदवारांच्या नावांची घोषणा केली होती.

दरम्यान, एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी भव्य रॅली काढून शक्तिप्रदर्शन केले. या मधल्या काळात एमआयएमने महाविकास आघाडीत सहभागी होण्यास साद घातली होती. पण, महाविकासकडून प्रतिसाद मिळाला नाही. आता तिसरी असलेली आघाडी परिवर्तन महाशक्तीही एमआयएमला सोबत घ्यायला तयार नाही.

आम्ही महाविकास आघाडी सोबत जाण्यासाठी तयार होतो. परंतु, त्यांच्याकडून अजून होकार आलेला नाही. तिसऱ्या आघाडीच्या नेत्यांनीही आमच्याबाबत जे विधान केले त्याचेही उत्तर आम्ही त्यांना दिलेले आहे. आम्हाला कुणी सोबत नाही घेतले तरी आमची आमच्या पद्धतीने लढण्याची तयारी आहे. आम्ही लढणार आणि जिंकणार.
- इम्तियाज जलील, प्रदेशाध्यक्ष एमआयएम

एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील काही दिवसांपासून महाविकास आघाडीने सोबत घ्यायला पाहिजे आम्ही त्यांच्यासोबत जाण्यासाठी तयार आहोत अशा प्रकारे जाहीरपणे बोलत आहेत.

पण, महाविकास आघाडीकडून कोणताही प्रतिसाद एमआयएमला मिळाला नाही. त्यानंतर राज्यात राजू शेट्टी, बच्चू कडू आणि संभाजीराजे छत्रपती यांनी परिवर्तन महाशक्ती नावाने तिसरी आघाडी स्थापन केली आहे.

बच्चू कडू यांनीसुद्धा एमआयएम विरोधात वक्तव्य करून एक प्रकारे त्यांना तिसऱ्या आघाडीत स्थान नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे एमआयएमला स्वबळावर लढण्याशिवाय सध्या तरी पर्याय नाही.

मात्र, राजकारणात कोणत्याही वेळी काहीही घडू शकते याच आशेवर आजही एमआयएम सावध भूमिका घेताना दिसत आहे.

एमआयएमने राज्यात सर्वच जागांवर लढवण्याचे संकेत दिले. अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे एमआयएम स्वबळावर लढणार हे आता स्पष्ट झाल्याचे दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

Latest Maharashtra News Updates : "खरी लाचारी आज बघितली" उपमुख्यमंत्री शिंदेंनी जय गुजरात दिलेल्या घोषणेवर मनसे नेत्याची टीका

IND vs ENG 2nd Test: W,W,W,W,W! मोहम्मद सिराज ऑन फायर, बेन स्टोक्स गांगरला; इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला

ती खूपच बारीक, काळी-सावळी... प्रियांका चोप्राला पहिल्यांदा पाहिल्यावर थक्क झालेली मराठी अभिनेत्री; म्हणाली- ती हिरोईन बनायला आलेली...

FASTag Annual Pass: FASTag वार्षिक पास घ्यायचा विचार करताय? मग घेण्यापूर्वी 'हे' 11 महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची सविस्तर उत्तरं जरूर वाचा!

SCROLL FOR NEXT