Beed Assembly Elections 2024 sakal
Maharashtra Election 2025 Result

Beed Assembly Elections 2024: कार्यालय आवारात सभा, आंदोलनांना निर्बंध

Beed Assembly Elections 2024: भिंतीवर पोस्टर्स, बॅनर्स लावून विद्रुपीकरण केल्यास होणार कारवाई...

सकाळ वृत्तसेवा

बीड: विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या काळात शासकीय कार्यालयाच्या आवारांत सभा तसेच कुठली आंदोलनेही करता येणार नाहीत. कार्यालयांचे पोस्टर आणि बॅनर लावून विद्रुपीकरण केले तर कारवाई केली जाणार आहे.

खासगी जागांवरही अशा बाबींसाठी परवानगी आवश्‍यक असल्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक निर्णय अधिकाारी अविनाश पाठक यांनी काढले.

जिल्हादंडाधिकारी, उपविभागीय दंडाधिकारी, तालुका दंडाधिकारी कार्यालय, शासकीय, निमशासकीय कार्यालये, संस्था आणि विश्रामगृहांच्या आवारात कोणत्याही राजकीय पक्षांना तसेच निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराला व त्यांच्या समर्थकांना सभा घेता येणार नाहीत. निवडणुकीसंबंधाने पोस्टर्स, बॅनर्स, पॅम्प्लेट्स, कटआऊट, पेंटिंग्स, होर्डिंग्ज देखील लावता येणार नाहीत. अन्य ठिकाणी देखील होर्डिंग्ज, बॅनर्स, पोस्टर्स व जाहिरातींसाठी परवानगी आवश्‍यक आहे.

नमुना मतपत्रिका छपाईसाठीही निवडणूक आयोगाने निश्चित केल्याप्रमाणे कागद वापरावा लागणार आहे. या काळात शासकीय कार्यालयांच्या आवारांत आंदोलने, मोर्चे, उपोषणेही करता येणार नाहीत.

राजकीय पक्ष, उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींच्या ताफ्यांत दहाच वाहने ठेवता येणार आहेत. प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांवर पक्ष प्रचाराचा झेंडा हा वाहनाच्या डाव्या बाजूला विंड स्क्रिन ग्लासच्या पुढे राहणार नाही आणि तो त्या वाहनाच्या टपापासून दोन फूट उंची पेक्षा जास्त राहणार नाही. वाहनांवर कापडी फलक वाहन चालकाच्या आसनामागे वाहनाच्या डाव्या व उजव्या बाजूने लावण्यात यावा.

ध्वनीक्षेपकाचा वापराासाठी पोलिस अधिकाऱ्यांची परवानगी लागणार आहे. पोस्टर्स, बॅनर्स, पॅम्पलेटस्, कटआऊटस, होर्डिंग्ज, कमानींमुळे रहदारीस अडथळा येणार नाही, याचीही काळजी घ्यावी लागणार आहे. आचार संहिता अंमलबजावणी काटेकोरपणे व्हावी, यासाठी प्रशासनाकडून विशेष लक्ष दिले जात आहे.

#ElectionWithSakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Registrar Dairy Department Transferred : रात्रीतून सुत्रे फिरली गोकुळच्या राजकारणाला नवे वळण, थेट दुग्ध विभागाच्या निबंधकांची उचलबांगडी; सभासद नोंदणी वाद भोवला

Vidhan Parishad Election: विधान परिषदेसाठी भाजपमध्ये 'ही' नावे चर्चेत, आमदारकीसाठी 'फिल्डिंग' लावायला सुरुवात, कुणाला मिळणार संधी?

India Petrochemical Duty Exemption : सरकारचा मोठा निर्णय ! ४० प्रमुख पेट्रोकेमिकल्सवरील आयात शुल्कात सूट,'या' उद्योगांना दिलासा

Latest Marathi News Live Update : रांजणगावमध्ये तरुणावर लाकडी बॅटने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Vidarbha News: भरधाव दुचाकीच्या अपघातात तरुण जागीच ठार; जाम महामार्गावर नियंत्रण सुटल्यामुळे दुचाकीने वाहनाला धडक

SCROLL FOR NEXT