Hingna Assembly Elections 2024 sakal
Maharashtra Election 2024 Result

Hingna Assembly Elections 2024: महाविकास आघाडीच्या उमेदवारीसाठी तिन्ही पक्षात रस्सीखेच; भाजपकडून समीर मेघें एकमेव उमेदवार

Hingna Vidhan Sabha elections 2024: महाविकास आघाडीमध्ये सहभागी असलेले तीनही पक्ष उमेदवारीसाठी इच्छुक असून पक्षातील वरिष्ठांकडे ‘फिल्डिंग’ लावण्यात व्यस्त आहेत.

- अजय धर्मपुरीवार

हिंगणा: महायुतीचे उमेदवार म्हणून भाजपचे आमदार समीर मेघे यांचे एकमेव नाव चर्चेत आहे. विरोधी पक्ष असलेल्या महाविकास आघाडीमध्ये सहभागी असलेले तीनही पक्ष उमेदवारीसाठी इच्छुक असून पक्षातील वरिष्ठांकडे ‘फिल्डिंग’ लावण्यात व्यस्त आहेत.

निवडणूक तोंडावर येऊन ठेपल्याने भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार) गट व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने जनसंपर्क अभियान सुरू केल्याचे चित्र दिसून येत आहे.

महायुती सरकारमधील सत्ताधारी भाजप आमदार समीर मेघे यांनी निवडणुकीपूर्वी विविध विकास कामांचा भूमिपूजन व लोकार्पण करण्याचा एक कलमी कार्यक्रम हाती घेतला आहे. रामटेक लोकसभेत काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे विजयी झाल्याने भाजपलाही धक्का बसला आहे. भाजपने जिल्हा परिषद व ग्रामपंचायत निवडणुकीत निष्ठावान व अनेक वर्षापासून पक्षाची धुरा सांभाळणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दूर ठेवले. लोकसभा निवडणुकीत नवख्या पदाधिकाऱ्यांच्या हातात निवडणुकीची धुरा दिली होती.

यामुळे याचा जबर फटका भाजपला बसला. काँग्रेसला १७, ८६२ मतांची सर्वाधिक आघाडी हिंगणा विधानसभा क्षेत्रात मिळाली. यामुळे भाजपने आता निष्ठावान कार्यकर्त्यांची नाराज असलेली फळी एकत्र आणणे गरजेचे आहे. विधानसभा निवडणुकीचा ताळमेळ जुळविण्यासाठी माजी आमदार सागर मेघे यांना मैदानात उतरावे लागणार आहे.

भाजपमध्ये सुरू असलेल्या ठेकेदार संस्कृतीमुळे मतदारांमध्ये कमालीची नाराजी आहे. हिंगणा विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा तीन वेळा निवडणुकीत पराभव झाल्याने काँग्रेसने या मतदारसंघावर दावा केल्याचे बोलले जात आहे. काँग्रेसचे नेते माजी मंत्री सुनील केदार यांनी या मतदार संघात काँग्रेसला उमेदवारी द्यावी, असा अट्टाहास सुरू केला आहे. केदार यांनी कळमेश्वर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा अनावरणाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना बोलावून प्रचाराचे रणशिंग फुंकले.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडूनही या विधानसभा क्षेत्रात दावेदारी केली जात आहे. नागपूर येथील हॉटेल रेडिसन ब्ल्यू येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. यात हिंगणा शिवसेना तालुकाप्रमुख विष्णू कोल्हे व युवा सेनेचे पदाधिकारी हर्षल काकडे यांनी मुलाखती दिल्या. यात विष्णू कोल्हे यांचे नाव आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे.

त्यांच्यात उत्साह व कार्यकर्ते जोडण्याची कल हा त्यांचा महत्वाचा गुण आहे. शिवाय गेल्या नं.प.निवडणुकीच्या वेळी जिल्ह्यातून ते एकमेव निवडून आल्यामुळे ‘एकच टायगर’ अशी शिवसेनेत त्यांची प्रतिमा तयार झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री रमेशचंद्र बंग, माजी आमदार विजय घोडमारे, जि.प.सदस्य उज्वला बोढारे, दिनेश बंग, संतोष नरवाडे व कर्मयोगी फाउंडेशनचे अध्यक्ष पंकज ठाकरे या सहा उमेदवारांच्या मुलाखती पुणे येथे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या उपस्थितीत पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्डासमोर पार पडल्या आहेत.

माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांचे पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांच्याशी घनिष्ठ संबंध आहे. यामुळे पवार साहेबांचा निर्णय अंतिम राहणार असल्याचे बोलले जात आहे. बहुजन समाजातील उमेदवाराला पक्षाने संधी दिल्यास सत्ताधारी भाजप पक्षालाही घाम फुटू शकतो, अशी राजकीय चर्चा सुरू आहे. काँग्रेसचे नेते सुनील केदार यांनीही हिंगणा विधानसभा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात दौरे व कार्यक्रम सुरू केले आहे. हिंगणा विधानसभेचा गुलाल आपणचं उधळू असा दावा त्यांनी अनेक सभांमधून केला. त्यांनी आपले राजकीय पत्ते गुलदस्त्यात ठेवले आहेत. यामुळे महाविकास आघाडीकडून कुणाला उमेदवारी मिळते, याकडे आता सर्वांचेच लक्ष केंद्रित झाले आहे.

हिंगणा विधानसभा

समाजातील मतांची टक्केवारी

  1. ओबीसी.........६३ टक्के

  2. अनुसूचित जाती....१५ टक्के

  3. अनुसूचित जमाती..१३ टक्के

  4. इतर समाज.........०९ टक्के

हिंगणा विधानसभा मतदारसंघ

  1. हिंगणा तालुका..५१ ग्रामपंचायत

  2. नागपूर तालुका..३८ ग्रामपंचायत

  3. नगर परिषद.......०४

  4. नगरपंचायत......०३

  5. एकुण गावे.......१८२

  6. मतदारांची संख्या...४,३३,३३६

  7. मतदान बुथ......४७२

जिल्हा परिषद सर्कल पक्षीय बलाबल

  1. काँग्रेस..............०४

  2. राष्ट्रवादी काँग्रेस...०३

  3. भाजप...............०३

नगर परिषद वाडी,वानाडोंगरी,वाडी,डिगडोह

नगरपंचायतच

निलडोह,हिंगणा,गोधणी

#ElectionWithSakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडमध्ये कसोटी सामना पाहून भारावला, गिलबद्दलही बोलला; लक्ष्मणमुळे U19 टीम इंडियाला मिळाला स्पेशल अनुभव

पन्नाशीतही फिट दिसण्यासाठी ऐश्वर्या नारकर फॉलो करतात हे रुटीन ; "कढीपत्त्याचं पाणी आणि डाएटिंग..."

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Yeola Railway Station : येवला रेल्वे स्थानकाची पाहणी; ४ प्रमुख गाड्यांना थांबा देण्याची मागणी

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

SCROLL FOR NEXT