Abdul Sattar Warns BJP Over Shiv Sena Cooperation  Esakal
Maharashtra Election 2024 Result

Abdul Sattar vs BJP: "तर शिवसैनिक भाजपचा हिशोब करतील"; महायुतीत कलह, शिंदेंच्या मंत्र्याचे खळबळ उडवणारे विधान

Abdul Sattar warns BJP of Shiv Sena: राज्यातील सरकारची मुदत नोव्हेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत आहे. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली आहे.

आशुतोष मसगौंडे

Latest Maharashtra Political Updates: राज्यात येत्या काही दिवसांत विधानसभा निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सर्वच पक्ष आणि आघाड्या लागल्या आहेत.

अशात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपही अंतिम टप्प्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे. असे असले तरी महायुतीमध्ये असलेल्या पक्षांत काही मंत्री आणि आमदारांची एकमेकांविरोधात नाराजी असल्याचे दिसत आहे. त्याचाच प्रत्यय मंत्री अब्दुल सत्तार यांच्या एका खळबळजन विधानातून आला आहे.

"जर भाजपने सिल्लोडमध्ये माझ्याविरोधात काम केले तर, शिवसेनाही महाराष्ट्रभर भाजप विरोधात काम करेल," असे विधान सत्तार यांनी केले आहे. दरम्यान सत्तार यांच्या या विधानानंतर महायुतीत वाद पेटण्याची शक्यता आहे.

काय म्हणाले अब्दुल सत्तार?

विधानसभा निवडणुकीत भाजप सिल्लोडमध्ये शिवसेनेला मतद करणार का? याबाबत प्रश्न विचारल्यानंतर मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, "येत्या विधानसभा निवडणुकीत जर सिल्लोडमध्ये भाजपने मला विरोध केला तर, शिवसेनाही भाजपचा मराठवाडा आणि राज्यात त्याचप्रकारे वागत हिशोब पूर्ण करेल. त्यामुळे ज्याप्रकारे भाजप काम करेल तसेच शिवसेना वागणार आहे."

दरम्यान एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद दिल्याने भाजपचे अनेकजन नाराज असल्याची चर्चा सुरू असताना सत्तार यांनी हे खळबळजनक विधान केले आहे. त्यांच्या या विधानामुळे भाजपच्या लोकांमध्ये आणखी संताप निर्माण होण्याची शक्यता आहे. असे असले तरी अब्दुल सत्तार यांच्या या विधानानंतर अद्यापही भाजपच्या कोणत्याही नेत्याची काही प्रतिक्रिया आलेली नाही.

काही दिवसांत लागणार निवडणुका

राज्यातील सरकारची मुदत नोव्हेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत आहे. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली आहे. त्याचाच भाग म्हणून निवडणूक आयोगाचे पथक गेल्या आठवड्यात आढावा घेण्यासाठी मुंबईत आले होते. त्यामुळे कोणत्याही वेळी राज्यात निवडणुका जाहीर होऊन आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel-Hamas Ceasefire Broken: ‘’गाझावर पूर्ण ताकदीने हल्ला करा...’’ ; नेतान्याहू यांनी लष्कराला दिले आदेश!

Prashant Kishor Notice : बिहार निवडणुकीआधी प्रशांत किशोर यांना धक्का! ; निवडणूक आयोगाने पाठवली नोटीस

Chhagan Bhujbal : छगन भुजबळ जसलोक रुग्णालयात दाखल

Deglur News : मराठवाडा साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष बाबू बिरादार यांचे दुःखद निधन; धनगरवाडीत अंत्यसंस्कार

सोशल मीडियावरील घटस्फोटाच्या चर्चा खऱ्या की खोट्या? सौरभपासून वेगळं होण्यावर योगिता चव्हाणने दिली प्रतिक्रिया, काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT