Ghansawangi Vidhan Sabha elections 2024 sakal
Maharashtra Election 2024 Result

Assembly Elections 2024 : घनसावंगीची जागा भाजपला सोडा; शिवाजी बोबडे यांची पक्षश्रेष्ठीकडे मागणी

Ghansawangi Vidhan Sabha elections 2024 : घनसावंगी विधानसभा मतदार संघ भाजपला सोडण्याची मागणी- तालुकाध्यक्ष शिवाजी बोबडे

सुभाष बिडे

घनसावंगी: भाजप महाराष्ट्र प्रदेश मराठवाडा विभागाची छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महाराष्ट्र विधानसभा समितीचे अध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे घनसावंगी विधानसभा मतदार संघ भाजपला सोडण्याची मागणी तालुकाध्यक्ष शिवाजी बोबडे यांनी निवेदनाद्वारे केली.

घनसावंगी मतदारसंघाची सद्यःस्थिती पाहता भाजपचे माजी आमदार विलास खरात यांची सहकारी बँक, सूतगिरणी, शिक्षण संस्था आहेत. त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. तसेच समृद्धी शुगरचे चेअरमन सतीश घाटगे हे भाजपात आहे. शेतकऱ्यांसाठी मराठवाड्यात उच्चांकी दर देणारा कारखाना म्हणून समृद्धी कारखान्याची ओळख निर्माण केली आहे.

त्यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपच्या कार्यकर्त्यांना ताकद देऊन मतदारसंघातील अनेक ग्रामपंचायतीवर निर्विवाद वर्चस्व मिळवले. तसेच मतदारसंघात ३५४ बूथ सक्षम करून गाव तिथे शाखा केली त्यामुळे ही जागा भाजपला सुटलीच पाहिजे अशी कार्यकर्त्याची आग्रहाची मागणी आहे. गेली पाच वर्षांची कार्यकर्त्याची मेहनत वाया घालू नये, असे शिवाजी बोबडे यांनी पक्षश्रेष्ठीकडे निवेदनाद्वारे कळवले आहे.

#ElectionWithSakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : शोध हरवलेल्या आवाजाचा!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 5 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

SCROLL FOR NEXT