Pandharpur-Mangalwedha Assembly sakal
Maharashtra Election 2024 Result

Pandharpur-Mangalwedha Assembly : महायुती व महाविकास आघाडीचे इच्छुक वेटिंगवर

Maharashtra Vidhan Sabha Elections 2024: आ. समाधान आवताडे यांना वेटिंग ठेवले असताना दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुक असलेल्याना वेटींगवर असल्याने दोन्ही पक्षाकडून नेमकी उमेदवारी कुणाला याची उत्सुकता शिगेला लागली.

सकाळ वृत्तसेवा

मंगळवेढा: विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या यादीत भाजपा कडून आ. समाधान आवताडे यांना वेटिंग ठेवले असताना दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुक असलेल्याना वेटींगवर असल्याने दोन्ही पक्षाकडून नेमकी उमेदवारी कुणाला याची उत्सुकता शिगेला लागली.

या मतदार संघात विद्यमान आ.समाधान आवताडे यांनी तीन हजार कोटी पेक्षा अधिक रकमेची विकास कामे करून निवडणूक जाहीर होण्यास काही दिवस शिल्लक असतानाच 1100 कोटीच्या विकास कामाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते केला.

त्यावेळी फडणवीस यांनी आ.समाधान अवताडे हेच संभाव्य उमेदवार असून त्यांना ताकद देण्याचे आवाहन केले होते मात्र भाजपने जाहीर केलेल्या 99 उमेदवाराच्या यादीत त्यांच्या नावाचा समावेश नसल्यामुळे मतदारसंघात उलट सुलट चर्चा सुरू झाल्या असतानाच दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या तुतारी चिन्ह मिळावे म्हणून भगीरथ भालके व अनिल सावंत यांच्यासह वसंत देशमुख,नागेश भोसले, राहुल शहा, चंद्रशेखर कोडूभैरी डॉ.संजयकुमार भोसले यांची नावे असली तरी तुतारीवर उमेदवारी घ्यावी अशी मागणी परिचारक समर्थकांकडून केली जात असली तरी प्रशांत परिचारक यांनी अध्याप आपली भूमिका स्पष्ट केली नाही,

त्यामुळे तुतारी चिन्हावर उमेदवारी कुणाला मिळणार याची चर्चा देखील या मतदारसंघात जोरात होत आहे.

यंदा प्रथमच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिलीप धोत्रे यांची उमेदवारी जाहीर करून ते देखील या मतदारसंघात कामाला लागले आहेत त्यामुळे तुतारीची उमेदवारी निश्चिती नंतर चौथा अपक्ष कोण राहणार तिरंगी लढत लागणार हे देखील पाणी महत्वाचे आहे. दरम्यान आ. समाधान आवताडे व प्रशांत परिचारक यांच्या वादात भाजपकडून तिसऱ्या उमेदवाराचा शोध घेणार की दोघांना एकत्र बसवून तोडगा काढणार हे देखील पाहणे महत्त्वाचे आहे मात्र उमेदवारी आपल्यालाच मिळावी यासाठी स्थानिक नेत्यांनी मुंबईत तळ ठोकला

#ElectionWithSakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: हॅरी ब्रुक - जो रुटची शतकं, पण सिराज-प्रसिद्धचा तिखट मारा; शेवटचा दिवस निर्णायक; जाणून घ्या समीकरण

ENG vs IND, 5th Test: भारताविरुद्ध शतक केल्यानंतर जो रुटने डोक्याला बँड बांधून का केला आकाशाकडे इशारा? पाहा Video

दिल्लीत मोठ्या घडामोडी, PM मोदींनंतर गृहमंत्री शहांनी घेतली राष्ट्रपतींची भेट; एकाच दिवशी भेटीचं कारण काय?

Shambhuraj Desai: गृहप्रवेशावेळी शंभुराज देसाईंना अश्रू अनावर; ‘मेघदूत’ बंगल्यावर बालपणीच्या आठवणींना उजाळा

Raigad Fort Conservation: 'रायगड संवर्धनाला येणार वेग'; संभाजीराजे यांची केंद्रीय सांस्कृतिक मंत्र्यांशी चर्चा

SCROLL FOR NEXT