N. Biren Singh Oath Taking Ceremony esakal
Election News

ठरलं! एन. बीरेन सिंह आज पुन्हा घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ

सकाळ डिजिटल टीम

जनता दल, कुकी पीपल्स अलायन्स आणि एक अपक्ष आमदारानं भाजपला बिनशर्त पाठिंबा दिलाय.

एन बिरेन सिंह (N. Biren Singh) आज दुपारी 3 वाजता मणिपूरमध्ये मुख्यमंत्रीपदाची (Manipur CM) शपथ घेणार आहेत. एन बिरेन सलग दुसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. या शपथविधी सोहळ्याला भाजप अध्यक्ष जेपी नड्डा (BJP President JP Nadda) देखील उपस्थित राहणार आहेत. मणिपूरचे राज्यपाल एल गणेशन (Manipur Governor L. Ganesan) यांनी रविवारी भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते आणि काळजीवाहू मुख्यमंत्री एन बीरेन सिंह यांना पुढील सरकार स्थापनेसाठी आमंत्रित केलंय. तत्पूर्वी, केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) आणि किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांनी पक्षाच्या वतीनं राज्यपालांना एक पत्र सादर केलंय. यात म्हटलंय, 'एन बिरेन सिंह यांची 32 आमदारांसह भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून एकमतानं निवड करण्यात आलीय.' (N. Biren Singh Oath Taking Ceremony)

राजभवनात दिलेल्या निवेदनात म्हटलंय, जनता दल (युनायटेड), कुकी पीपल्स अलायन्सचे दोन सदस्य आणि एक अपक्ष यांनी भाजपला (BJP) बिनशर्त पाठिंबा दिलाय. त्यांनी दिलेल्या पाठिंब्याची पत्रंही राज्यपालांना सादर करण्यात आली आहेत. यासह 60 सदस्यांच्या मणिपूर विधानसभेत भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारचं संख्याबळ 41 आणि दोन तृतीयांश बहुमत असं झालंय. आदल्या दिवशी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घोषणा केली की, एन बीरेन सिंह दुसऱ्यांदा मणिपूरचे मुख्यमंत्री म्हणून कायम राहतील. सीतारामन यांना भाजपनं केंद्रीय निरीक्षक म्हणून मणिपूरला पाठवलं होतं.

सीतारामन आणि केंद्रीय कायदा व न्याय मंत्री किरेन रिजिजू यांना सह-पर्यवेक्षक बनवण्यात आलं होतं. ते राज्यातील नवनिर्वाचित भाजप आमदारांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी रविवारी इम्फाळला पोहोचले होते. दरम्यान, केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव, भाजपचे राज्यसभा सदस्य लैशेम्बा सनाजोबा आणि पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनीही या महत्त्वपूर्ण बैठकीला हजेरी लावली होती. मणिपूरमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत (Manipur Assembly Election) भाजपनं 60 सदस्यांच्या सभागृहात 32 जागा जिंकून सत्तेत पुनरागमन केलंय. 2017 च्या निवडणुकीत भाजपनं केवळ 21 जागा जिंकल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Price Today: दसऱ्यानंतर सोन्याच्या भावात घसरण; चांदीत वाढ कायम, काय आहे आजचा भाव?

गायक झुबीन गर्ग यांच्या मृत्यूचं गुढं उलगडलं, स्कुबा डायव्हिंग नाही तर हे होतं मोठं मृत्यूचं कारण, पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर

पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूचा ‘Azad Kashmir’चा नारा; माफी मागायची सोडून आपलीच टिमकी मिरवतेय...

'तुम्हाला I Love Modi म्हटलं तर चालतं, मग I Love Mohammad म्हटलं तर वाद का?' ओवेसींचा थेट सवाल, मोदींसह RSS वर जोरदार निशाणा

Kantara Chapter 1 Box Office : 'कांतारा चॅप्टर 1' वादळ! पहिल्या दिवशी केली तब्बल 'इतक्या' कोटींची कमाई, छावा-सैयारासह 10 चित्रपटांचा मोडला रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT