Odisha Panchayat Election esakal
Election News

Odisha Panchayat Election : ओडिशात BJD पडलं भाजपवर भारी

सकाळ डिजिटल टीम

सत्ताधारी बीजू जनता दलनं 249 जिल्हा परिषदेच्या जागांवर आघाडी घेतलीय.

ओडिशा पंचायत निवडणुकीच्या (Odisha Panchayat Election) सुरुवातीच्या ट्रेंडनुसार, सत्ताधारी बीजू जनता दलनं Biju Janata Dal (BJD) 249 जिल्हा परिषदेच्या जागांवर आघाडी घेतलीय, तर भाजपनं (BJP) 32 जागांवर आणि कॉंग्रेसनं (Congress) 13 जागांवर आघाडी घेतल्याचं समजतंय. अधिकाऱ्यांनी आज (शनिवार) ही माहिती दिलीय. राज्य निवडणूक आयोगाच्या (Odisha Election Commission) अधिकार्‍यांनी सांगितलं की, कोविड-19 मार्गदर्शक तत्त्वांचं काटेकोर पालन करून 315 ZP जागांसाठी मतमोजणी आज सकाळी 8 वाजता विविध ब्लॉक मुख्यालयात सुरू झाली. यामध्ये 99 जिल्हा परिषदेच्या जागांचे कल हाती आलेत, त्यानुसार बीजद 249 जागा, भाजप 32 जागा, काँग्रेस 13 जागांवर पुढं आहे.

जिल्हा परिषद (Zilla Parishad Election) झोनमधील उर्वरित 307 जागांसाठी 27 फेब्रुवारीला, तर जिल्हा परिषदेच्या 229 जागांसाठी 28 फेब्रुवारीला मतमोजणी होणार असल्याचंही अधिकार्‍यांनी सांगितलं. राज्य निवडणूक आयोगाचे सचिव आर. एन. साहू म्हणाले, पीठासीन अधिकाऱ्यांनी तयार केलेल्या मतपत्रिकेत तफावत आढळल्यास, त्या मतपत्रिकांची दखल घेतली जाईल, असं त्यांनी नमूद केलंय.

आजपासून तीन दिवस मतमोजणी होणार आहे. या जागांसाठी 16, 18, 20, 22 आणि 24 फेब्रुवारीला पाच वेगवेगळ्या टप्प्यात मतदान झालं आहे. ओडिशात गुरुवारी पंचायत निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात जवळपास 70 टक्के मतदान झालं आणि 41.81 लाख मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. आयोगाच्या म्हणण्यानुसार, निवडणुकीच्या चार टप्प्यात मतदानाची टक्केवारी 70 टक्क्यांहून अधिक होती. चौथ्या टप्प्यात 79 टक्के, तिसऱ्या टप्प्यात 78.6 टक्के, दुसऱ्या टप्प्यात 78.3 टक्के आणि पहिल्या टप्प्यात 77.2 टक्के मतदान झालं. दरम्यान, आयोगानं 45 मतदान केंद्रांवर पुन्हा मतदान घेतलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pankaja Munde: ''बप्पा तुम्ही भाग्यवान.. कापनीच्या वेळी आलात'' पंकजा मुंडेंकडून बजरंग सोनवणेंना चिमटा

Modi-Shivraj Singh Chouhan : मोदींना पहिल्यांदा कधी भेटले होते शिवराज सिंह चौहान? जाणून घ्या, 'ती' खास आठवण!

Digital Panvel: ‘डिजिटल पनवेल’साठी पहिले पाऊल! महापालिका कार्यालयात किओस्क यंत्रणेचा वापर

Budhwar Peth Pune: तरुण बुधवारपेठेत गेला पण पैसे देताना पेमेंट अ‍ॅपचा पासवर्ड विसरला, तीन महिलांनी असं काही केलं की....

10-20 करोड नाही तर सिडनी स्वीनीला बॉलिवूड फिल्मसाठी ऑफर केले इतके रुपये, ती सुद्धा झाली SHOCK !

SCROLL FOR NEXT