Election News

Chhatisgarh Election: थरारक! छत्तीसगडमध्ये पोलिंग पार्टीच्या मार्गात नक्षलींनी केला स्फोट; एक जवान शहीद

छत्तीसगडमध्ये आज विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडलं.

Amit Ujagare (अमित उजागरे)

रायपूर : छत्तीसगडमध्ये आज दुसऱ्या टप्प्यातील विधानसभेचं मतदान पार पडलं. पण यावेळी नक्षलवाद्यांनी हिंसाचार घडवून आणला. एका पोलिंग पार्टीच्या मार्गात त्यांनी स्फोटकं पेरुन ठेवली होती.

या स्फोटकांचा स्फोट झाल्यानं त्यात एक आयटीबीपीचा जवान शहीद झाला आहे. पण पोलिंग पार्टीतील निवडणूक अधिकारी आणि ईव्हीएम मशिन सुखरुप आहे. एएनआयनं याबाबत वृत्त दिलं आहे. (One ITBP jawan lost his life in an IED blast carried out by Naxalites in Chhattisgarh Gariaband today)

एका जवानाचा मृत्यू

बडे गोब्रा मतदान केंद्रावरुन निवडणूकीचं सामान घेऊन गरियाबंदकडं निघालेल्या अधिकाऱ्यांना नक्षलवाद्यांनी टार्गेट केलं. यावेळी झालेल्या स्फोटात आयटीबीपीचे कॉन्स्टेबल जोगिंदर सिंह यांचा मृत्यू झाला. (Marathi Tajya Batmya)

पण पोलिंग पार्टी आणि ईव्हीएम मशिन सुरक्षित असून ते गरिबंदला व्यवस्थित पोहोचले असल्याचं रायपूरचे पोलीस महासंचालक अरिफ शेख यांनी सांगितलं. (Latest Marathi News)

ईव्हीएम, पोलिंग पार्टी सुरक्षित

गरिबंदचे अतिरिक्त पोलीस अधीक्षकांनी सांगितलं की, मतदान संपल्यानंतर पोलिंग पार्टी ईव्हीएम केंद्रामध्ये जमा करण्यासाठी निघालेले असताना हा स्फोट झाला. निवडणूक केंद्रापासून तीन किमी अंतरावर हा हल्ला झाला. यानंतर या भागातील पोलीस हायअॅलर्टवर आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asaduddin Owaisi : 'ते शरद पवार यांचे झाले नाहीत, मग जनतेचे काय होणार?' खासदार असदुद्दीन ओवैसींचा अजित पवारांवर थेट हल्ला

Nanded Municipal Corporation Election : महापालिकेत यंदा कोणाला संधी? काँग्रेसला १३ वेळा महापौरपदाचा मान; शिवसेनेला एकदाच मिळाली संधी

'सुरज कुठे गेला?' बिग बॉसच्या रियुनियन पार्टीला सुरजला बोलवलं नाही? पाचही सीझनचे स्पर्धेक उपस्थित पण...

Mumbai Election Campaign : प्रचारासाठी गर्दीचा भाव वधारला! तासाभराच्या घोषणांसाठी मोजावे लागतायत १,००० रुपये!

Ajit Pawar Rally Chaos : मिरजेत अजित पवारांच्या सभेत गोंधळ; उमेदवारावर तडीपारीच्या कारवाईने समर्थक संतापले

SCROLL FOR NEXT