Pune By Election esakal
Election News

लक्ष्मण जगताप मृत्युशी झुंज देत होते, तेव्हाच भाजपने पोटनिवडणुकीची तयारी सुरू केली; राष्ट्रवादीचा खळबळजनक आरोप

भाजपकडून लक्ष्मण जगताप यांच्या घरात उमेदवारी नाही?

रुपेश नामदास

चिंचवड आणि कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज पासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने पोटनिवडणुकीची रंगत वाढणार आहे. मात्र, ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी भारतीय जनता पक्षाने विरोधकांना पत्र देऊन साकडे घातले आहे.

मात्र ही निवडणुक बिनविरोध होणार नाही. राष्ट्रवादीने या पोटनिवडणुकीत उमेदवाराची चाचपणी केली असून लवकरच या जागेसाठी उमेदवार जाहीर होणार आहे.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळचे आमदार सुनील शेळके यांनी मोठा गैप्यस्फोट केला आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

चिंचवड विधानसभेच्या रणनीतीची जबाबदारी पक्षाने सुनील शेळके यांच्यावर सोपवली आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी राष्ट्रवादीची पहिलीच बैठक चिंचवडमध्ये पार पडली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलतांना शेळके यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.

ते म्हणाले की, दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन होण्यापुर्वीच भाजपने या जागेवर पोटनिवडणुकीची तयारी चालू केली होती.

लक्ष्मण जगताप यांचे निधन 3 जानेवारीला झाले. मात्र भाजपने तीन महिने अगोदरच चिंचवड पोटनिवडणुकीची तयारी चालू केली होती.

मुंबई सोडून भाजपने कोल्हापूर उत्तर आणि पंढरपूरमध्ये उमेदवार दिले या ठिकाणी त्यांनी सहानभूतीचा विचार केला नाही. असा आरोप सुनील शेळके यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugar Price Hike Maharashtra : साखरेचे भाव क्विंटलमागे 900 रुपयांनी घसरले; तरीही किरकोळ बाजारात दर 67 रुपयांवर, फायदा साठेबाजांचाच?

कोकण आपलोच आसा! सनई चौघडे मालिकेची टीम पोहचली कणकवलीत, फोटो पाहिलेत का?

MPSC Paper Leak: परीक्षा झाली, मुलाखतीही झाल्या; मग MPSC ने संपूर्ण भरतीच का रद्द केली? पेपरफुटीचा मुद्दा पुन्हा चर्चेत

Latest Marathi News Live Update : टीम कुक ‘ॲपल’ची धुरा सोडणार

Kolhapur Gender Determination Case: गर्भलिंग निदानप्रकरणी ‘एस.पी. टोळी’ला मोका; राज्यातील पहिलीच कारवाई; ११ जणांवर बडगा

SCROLL FOR NEXT