Reventh Reddy 
Election News

Revanth Reddy: मुख्यमंत्रीपदासाठी घोषणा झाल्यानंतर रेवंथ रेड्डींनी केलं ट्विट; म्हणाले, आमच्या सैनिकांनी...

तेलंगाणात काँग्रेसच्या सत्तेचे शिल्पकार ठरलेले प्रदेशाध्यक्ष रेवंथ रेड्डी अपेक्षेप्रमाणं आता मुख्यमंत्रीपदावर विराजमान होणार आहेत.

Amit Ujagare (अमित उजागरे)

हैदराबाद : तेलंगाणात काँग्रेसच्या सत्तेचे शिल्पकार ठरलेले प्रदेशाध्यक्ष रेवंथ रेड्डी अपेक्षेप्रमाणं आता मुख्यमंत्रीपदावर विराजमान होणार आहेत. पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी याची घोषणा केली.

यानंतर रेवंथ रेड्डी यांनी ट्विट केलं असून पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे आभार मानले तसेच काँग्रेस कार्यकर्त्यांचा उल्लेख सैनिक असा करत त्यांचंही मन जिंकलं आहे. यापार्श्वभूमीवर तेलंगणात काँग्रेसच्या गोटात उत्साहाचं वातावरण आहे. (Revanth Reddy tweeted after Congress announced his name for the post of CM of Telangana)

कार्यकर्त्यांचा केला सैनिक म्हणून उल्लेख

रेवंथ रेड्डी यांनी ट्विट केलं आणि म्हटलं की, “मी AICC अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी वड्रा, AICC सरचिटणीस केसी वेणुगोपाल, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार आणि प्रभारी यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. तसेच तेलंगणाचे काँग्रेसचे सरचिटणीस माणिकराव ठाकरे तसेच शेवटचे पण कमी नसलेले आमचे काँग्रेस सैनिक जे माझ्या कायम पाठिशी उभे राहिले त्यांचेही मी आभार मानतो. (Latest Marathi News)

काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपदासाठी घोषणा

केसी वेणुगोपाल यांनी पत्रकार परिषदेत तेलंगणाच्या मुख्यमंत्रीपदासाठी रेवंथ रेड्डी यांच्या नावाची घोषणा केली. ते म्हणाले की, रेड्डी अनुभवी आहेत, त्यांनी लोकांसोबत काम केलं आहे. तसेच तेलंगणाच्या जनतेसाठी त्यांनी आश्वासनं दिली आहेत, ती पूर्ण करण्यासाठी काँग्रेस मुख्यमंत्री म्हणून आम्ही त्यांच्या नावाची घोषणा करत आहोत. (Latest Marathi News)

काँग्रेसला तेलंगणात बहुमत

रेवंथ रेड्डी हे तेलंगाणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असून काँग्रेसच्या विजयासाठी त्यांनी कंबर कसली होती. त्यांच्या मेहनतीचं फळ त्यांना आणि काँग्रेसला देखील मिळालं आहे. ११९ जागा असणाऱ्या तेलंगणात ६० जागा हा बहुमताचा आकडा होता तो काँग्रेसने पर करत ६४ जागा जिंकल्या. तर सत्ताधारी राहिलेल्या भारत राष्ट्र समितीला ३९ जागांवर समाधान मानावं लागलं. भाजपनं तिसऱ्या क्रमांकावर ८ जागा जिंकल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Pune Kondhwa Rape Case : पुणे 'कुरियर बॉय' बलात्कार प्रकरण; आरोपीस अटक अन् धक्कादायक माहितीही उघड!

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

IND vs ENG 2nd Test: २४ वर्षांच्या पोराचे शतक! जेमी स्मिथ-हॅरी ब्रूक्सच्या खेळीने इंग्लंडचा पलटवार; गौतम गंभीरचा फसला प्लॅन

Ulhasnagar Crime : दारू पार्टीतील किरकोळ वादातून मित्राकडून मित्राचा खून; आरोपी शकील शेखला बेड्या

SCROLL FOR NEXT