Pune By Election Result esakal
Election News

Pune By Election Result: चमत्कार तर घडला पण धंगेकरांच्या घवघवीत यशामागे आहे हा अदृश्य 'हात'

रुपेश नामदास

Pune By Election News: कसबा पेठेतील पोटनिवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपच्या बालेकिल्याला महाविकास आघाडीने सुरुंग लावला आहे. कसबा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी प्रतिस्पर्धी हेमंत रासने यांना पराभवाची धूळ चारली आहे.

कसबा पेठ मतदार संघात भाजपकडून हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेसकडून रविंद्र धंगेकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांच्याकडे कसब्याची निरीक्षक पदाची जबाबदारी होती. ही जबाबदारी थोपटे यांनी चांगल्या प्रकारे पार पाडली.

जरी ही निवडणूक राज्यातील नेत्यांनी प्रतिष्ठेची केली तरी देखील थोपटे यांनी पडद्यामागे राहून धंगेकर यांच्या विजयासाठी सूत्र फिरवली. सोबतच पक्षातील बंडखोरी थोपवण्यात त्यांना यश मिळालं.

त्यांनी आखलेली रणनीती, जुन्या कार्यकर्त्यांना दिलेला मानसन्मान आणि राष्ट्रवादी,शिवसेना (ठाकरे) आणि मित्र पक्षांबरोबर योग्य ताळमेळ त्यांनी ठेवला त्यामुळे धंगेकर यांना ही निवडणूक सोपी होऊन गेली.

विरोधी पक्षाने देशातील, राज्यातील नेत्यांना प्रचाराला उतरावून देखील भाजपला आपला बालेकिल्ला राखता आला नाही. म्हणून धंगेकर यांच्या विजयामध्ये जेवढ वाटा राज्यातील नेत्यांचा आहे. तेवढाच वाटा पडद्यामागून संग्राम थोपटे यांचा देखील आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Ganeshotsav: गणेशोत्सवासाठी मंडपात वीज कनेक्शन हवंय? BEST च्या ११ अटी पूर्ण करा, ELCB रिपोर्टही द्यावा लागणार, नवे नियम काय?

MS DHONI CSK STAKE CONTROVERSY: धोनीला CSKमध्ये २५ टक्के हिस्सा हवा होता? दाव्याने खळबळ, आकाश चोप्रांनी सांगितलं नेमकं सत्य

‘मराठी डाऊनमार्केट भाषा आहे असं सांगण्यात आलं’ चिन्मयी सुमीत यांनी सांगितला मुंबईतील जीमचा धक्कादायक अनुभव

सणासुदीत अन्नसुरक्षेवर FDAची नजर! शाळा, अंगणवाड्यांसह सेंट्रल किचनची तपासणी; नवे आदेश जारी करणार

Marathi News Live Updates : नेपाळमधील अचानक आलेल्या पुरामुळे मृतांची संख्या २५८ वर पोहोचली

SCROLL FOR NEXT