shivraj singh chauhan profile madhya pradesh assembly election 2023 result marathi news  
Election News

MP Election Result : काँग्रेसला २० वर्षांपासून 'मामा' बनवणारे शिवराज सिंह चौहान, MPच्या जनतेचे का आहेत लाडके?

मध्य प्रदेश विधानसभा निवडणूकीत मामा नावाने प्रसिद्ध असलेले राज्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच नेतृत्व जनतेने पुन्हा एकदा मान्य केल्याचे पाहायला मिळत आहेत.

रोहित कणसे

मध्य प्रदेश विधानसभा निवडणूकीत 'मामा' नावाने प्रसिद्ध असलेले राज्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच नेतृत्व जनतेने पुन्हा एकदा मान्य केल्याचे पाहायला मिळत आहेत. शिवराज सिंह चौहान हे पुन्हा एकदा मध्यप्रदेशात बहुमत मिळवताना दिसत आहेत. त्यांचं पॉलिटीकल करिअर धोक्यात आहे म्हणणाऱ्यांना चौहान यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

विधानसभा निवडणूक २०२३ ही भाजपसोबतच सध्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासाठी देखील कठीण परीक्षा असल्याचे बोलले जात होते. चौहान हे तब्बल २० वर्षांपासून मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान आहेत. २० वर्षात त्यांनी राज्यात अनेक कल्याणकारी योजना राबवल्या आहेत. याचा परिणाम म्हणून जनतेने पुन्हा एकदा शिवराज सिंह चौहान यांना संधी दिली आहे.

शिवराज सिंह चौहान यांचा जन्म ५ मार्च १९५९ च्या सीहोर जिल्ह्यातील जैत या गावात झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव प्रेम सिंह चौहान आणि आईचं नाव सुंदरबाई चौहान आहे. शिवराज सिंह चौहान कीर समाजाशी निगडीत आहेत जे शेती करतात. शिक्षणाविषयी बोलायचे झाल्यास शिवराज सिंह चौहान यांनी बरकतउल्ला यूनिव्हर्सिटीमधून एमचे शिक्षण घेतलं आहे. त्यांनी तत्वज्ञान विषयातून एमएमध्ये गोल्ड मेडल देखील जिंकलं होतं, मात्र त्यांनी अॅग्रीकल्चरीस्ट हाच पेशा म्हणून निवडला.

शिवराज सिंह चौहान हे मध्य प्रदेशात सर्वाधिक काळासाठी मध्य प्रदेशचा मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळणारे पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. याखेरीज मध्ये प्रदेशात सर्वाधिक वेळा मुख्यमंत्री बनल्याचं रेकॉर्ड देखील त्यांच्याच नावावर आहे.

२४ मार्च २०२० रोजी शिवराज सिंह चौहान यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून चौथ्यांदा शपथ घेतली होती. शिवराज सिंह चौहन १९७२ मध्ये जेव्हा ते १३ वर्षांचे होते तेव्हापासून आरएसएसमध्ये सामील झाले होते.

दरम्यान मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक २०२३ च्या निकालानंतर आता मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर विक्रमी पाचव्यांदा शिवराज सिंह बसणार की दुसऱ्या कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

फक्त दीड लाख लोकसंख्या असलेला देश फीफा वर्ल्डकपसाठी पात्र; प्रशिक्षकाच्या अनुपस्थितीत घडवला इतिहास

PMPML Buses : पुणेकरांसाठी मोठी बातमी! पीएमपीच्या ताफ्यात ४ महिन्यात येणार २००० नवीन बस; प्रवासीसंख्या २० लाखांवर नेण्याचे लक्ष्य

DSP Chitra Kumari : कोचिंग न घेता 20 व्या वर्षी बनली DSP; वडिलांनी लेकीच्या शिक्षणासाठी विकली जमीन, देशभर चर्चेत असलेली सुपर गर्ल कोण?

Malegaon News : मालेगाव जन्मदाखला घोटाळा: १ हजार २७३ दाखले रद्द, ५०० नागरिक गायब; २४ जणांनी परदेशात पलायन केल्याचा किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

Latest Marathi Breaking News Live Update : पुण्यात कोयता गँगचा धुमाकूळ, रेस्टॉरंट आणि बारमध्ये घुसून राडा

SCROLL FOR NEXT